सेवा निवृत्त पोलीस निरीक्षक शिवाजीराव तादलापूरकर यांचे निधन 

0
WhatsApp-Image-2026-05-13-at-11.09.50.jpeg


नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड येथील रहिवाशी शिवाजीराव केरबाजी तादलापूरकर (माजी वरिष्ठ पोलिस निरीक्षक, मुंबई) यांचे आज दिनांक १३ मे २०२६ रोजी पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले.

स्व. तादलापूरकर यांनी मुंबई पोलिस दलात वरिष्ठ पोलिस निरीक्षक म्हणून दीर्घकाळ प्रामाणिक व कर्तव्यदक्ष सेवा बजावत समाजात आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांच्या निधनामुळे कुटुंबीय, मित्रपरिवार तसेच परिचितांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पार्थिवावर गुरुवार, दिनांक १४ मे २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता तुळशी निवास, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौक, खोब्रागडे नगर क्र. १, अशोका हॉटेलच्या पाठीमागे, नवा मोंढा येथून अंत्ययात्रा निघून गोवर्धन घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.त्यांच्या पश्चात मोठा परिवार आहे.


Post Views: 16






Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed