[ads1]
![]()
हिंगोली शहरातील बावनखोली भागात हळदीच्या कार्यक्रमात नाचण्याच्या कारणावरून तसेच धक्का लागण्याच्या किरकोळ कारणावरून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये तिघे जण गंभीर जखमी झाले असून परस्पर तक्रारीवरून 19 जणांवर गुरुवारी ता. 3 पहाटे हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली शहरातील बावनखोली भागात विवाह समारंभापुर्वी हळदीचा कार्यक्रम होता. बुधवारी ता. 2 रात्रीच्या वेळी हळदीचा कार्यक्रम सुरु होता. यावेळी काही तरूण नाचत असतांना एकमेकांना धक्का लागला. यावेळी शेख खलील व सिध्दांत कसबे यांच्यात वाद सुरु झाला. यामध्ये किरकोळ कारणावरून सुरु झालेला वाद हाणामारीपर्यंत पोहेचला. यावेळी झालेल्या हाणामारीत शेख खालिद, व सिध्दांत कसबे यांच्या पोटात, मानेवर खंजरने वार झाल्याने ते जखमी झाले तसेच शेख इरफान यास लोखंडी कड्याने मारहाण झाल्याने तो देखील जखमी झाला. या घटनेमुळे परिसरात एकच गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपाधिक्षक सतीष वाघ, पोलिस निरीक्षक देवेंद्रसिंह ठाकुर, सहाय्यक पोलिस निरीक्षक आनंद बनसोडे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक संजय मार्के, जमादार अशोक धामणे, गणेश लेकुळे यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या मारहाणीतील जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी सिध्दांत कसबे यांच्या तक्रारीवरून शेख इरफान, शेख उमेर, शेख साजीद, शेख इरशाद, शेख खालिद, समीर ताजू व इतर 9 अशा 15 जणांवर हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तर याच प्रकरणात शेख खालीद यांच्या तक्रारीवरून सिध्दांत कसबे, सुशील कसबे, लल्ला कसबे, ज्ञानेश्वर कसबे यांच्या विरुध्द गुुन्हा दाखल झाला आहे. पोलिस उपनिरीक्षक गजानन साखरे पुढील तपास करीत आहेत.
[ads2]
What do you feel about this post?
Like
Love
Happy
Haha
Sad