Maharashtra: Thackeray Group Internal Conflict, Raut


महाविकास आघाडी एकत्र ठेवण्याची भाषा करणाऱ्यांनी आधी स्वतःचा पक्ष एकसंध ठेवावा. उबाठा गटामध्ये भास्कर जाधव विरुद्ध मिलिंद नार्वेकर, आदित्य ठाकरे विरुद्ध संजय राऊत असे अनेक गट निर्माण झाले असून पक्षातच अंतर्गत संघर्ष सुरू आहे. अशा परिस्थितीत महाविकास आ

.

नवनाथ बन म्हणाले की, संजय राऊत आणि काँग्रेसने सुरुवातीपासून राम मंदिर उभारणीला विरोध केला, राम मंदिर आंदोलनाची खिल्ली उडवली आणि आता कथित दानपेटी प्रकरणाच्या नावाखाली पुन्हा राम मंदिराला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू असून दोषी आढळणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होईल. मात्र कोणत्याही आधाराशिवाय भारतीय जनता पक्ष आणि राम मंदिरावर आरोप करणे हे केवळ राजकीय हेतूने सुरू आहे. प्रभू श्रीरामांवर 140 कोटी भारतीयांची श्रद्धा असून राम मंदिराची बदनामी करण्याचा प्रयत्न जनतेला मान्य होणार नाही.

आणीबाणी हा लोकशाहीवरील काळा डाग

नवनाथ बन म्हणाले की, आणीबाणी हा भारतीय लोकशाहीवरील काळा डाग असून तो इतिहास विद्यार्थ्यांना शिकवलाच पाहिजे. त्या काळात लाखो नागरिकांना विनाकारण तुरुंगात डांबण्यात आले, मूलभूत अधिकार हिरावले गेले आणि लोकशाहीची गळचेपी करण्यात आली. अशा काळ्या इतिहासाचे समर्थन करणे हे अत्यंत दुर्दैवी आहे. राऊतांनी जयप्रकाश नारायण, अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांच्यावर टीका करण्याऐवजी काँग्रेसच्या आणीबाणीच्या पापाचा निषेध करावा. आज खरी आणीबाणी उबाठा गटातच आहे, कारण पक्षात अंतर्गत लोकशाही उरलेली नाही.

राऊतांकडे आता फुसके फटाके उरले

नवनाथ बन म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बॉम्ब टाकण्याच्या धमक्या देणाऱ्यांनी आधी स्वतःची राजकीय ताकद तपासावी. तुमच्याकडे आता बॉम्ब तर दूरच, सुतळी बॉम्बही उरलेला नाही. फक्त लवंगी फुसके फटाके उरले आहेत. पोकळ धमक्या देणे आणि वायफळ बडबड करणे एवढेच तुमचे काम राहिले आहे. मोदी पाकिस्तानला धडा शिकवताना कोणाची परवानगी घेत नाहीत आणि महाराष्ट्राच्या जनतेनेही निवडणुकांमधून संजय राऊत यांच्या राजकारणाला उत्तर दिले आहे. त्यामुळे इतरांना धमक्या देण्यापेक्षा स्वतःचे उरलेसुरले राजकारण सांभाळावे.

हे ही वृत्त वाचा

विरोध केला तर बॉम्ब टाकेन, घरात घुसून मारेन:संजय पाटलांच्या धमकीवरून संजय राऊत आक्रमक, पोलिस आयुक्तांकडे केली अटकेची मागणी

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी मुंबईचे पोलिस आयुक्त देवेन भारती यांना पत्र लिहून खासदार संजय दिना पाटील यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. आंदोलकांना धमक्या देणे, बॉम्ब टाकण्याची भाषा करणे आणि जीवघेण्या इशाऱ्यांमुळे समाजात भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचा आरोप त्यांनी पत्रात केला आहे. वाचा सविस्तर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *