[ads1]
![]()
शहरात वाळूमाफियांची मुजोरी पराकोटीला पोहोचली असून अवैध वाळूची वाहतूक करणारा हायवा पकडल्याचा राग धरून पोलिस उपनिरीक्षकांच्या अंगावर स्कार्पिओ गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना १ सप्टेंबरच्या सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली. या थरारानंतर पसार आरोपीने “पोलिस माझे काहीच करू शकत नाहीत’ अशी रील बनवून सोशल मीडियावर व्हायरल केली. उपनिरीक्षक केशरसिंग फुलांसेंग जारवाल (३९) हे विजय चौधरी यांच्यासह हिवरखेडा रोडवर गस्त घालत होते. यावेळी विनाक्रमांकाचा हायवा थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, हायवा चालकाने गाडी न थांबवता पळ काढला. पाठीमागून आलेल्या विनाक्रमांकाच्या स्कार्पिओने पीएसआय जारवाल यांच्या दुचाकीस थेट उडवण्याचा प्रयत्न केला. दुसरीकडे, सिद्धीविनायक कॉलनीत हायवा चालकाने वाळू रिकामी केली. त्याला अडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोकॉ. विजय चौधरी यांच्यावरही आरोपीने हायवा अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. चौधरी यांनी वेळेवर बाजूला उडी मारल्याने त्यांचा जीव वाचला. जखमी जारवाल संभाजीनगर येथे उपचारासाठी पाठवले आहे. या प्रकरणी पीएसआय जारवाल यांच्या फिर्यादीवरून बंडू उर्फ योगेश भोसले, त्याचा अनोळखी साथीदार आणि हायवा चालकावर गुन्हा दाखल आहे. तपास डीवायएसपी आरती पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. उडी मारल्याने वाचला जीव
[ads2]
What do you feel about this post?
Like
Love
Happy
Haha
Sad