देगलूरच्या जुगार अड्ड्यात स्वयंघोषित पत्रकार असलेल्या शिक्षकाची दलाली
नांदेड (प्रतिनिधी)- देगलूर शहरातील जुगार अड्ड्याची बातमी प्रकाशित करताच जुगार अड्डा मालकाच्या एका फंटाराने नांदेडमधील एका वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीस विशेष द्रव घेऊन फोनवरून धमकी दिल्याचा प्रकार घडला आहे.
देगलूर मधील मानांकित शिक्षण संस्थेत शारीरिक शिक्षण विषयाचे शिक्षक असलेल्या व स्वतःला पत्रकार समजणाऱ्या त्या स्वयंघोषित पत्रकाराने जुगार अड्ड्याची बातमी का प्रकाशित केलीत ? तो अड्याचा मालक माझा खास मित्र आहे, तुमचं जे काय आहे ते मी करून टाकतो मी त्यांना बोललो , तुमचा पाकीट तुम्हाला पोहोचवितो असे म्हणत ती पोस्ट डिलीट करण्यास सांगितली.
नांदेड येथील पत्रकाराने पोस्ट तर डिलीट होणारच नाही शिवाय तुम्ही जुगार चालकाचे बाजू घेणारे कोण ? अशी विचारणा करीत तुम्ही पत्रकार असून तुमच्या पेशास असे कृत्य शोभनीय नाही म्हणताच, त्या शिक्षकाने मी एक पत्रकार आहे, नांदेड जिल्ह्यातील अनेक ज्येष्ठ, ऑल इंडिया,वरिष्ठ पत्रकारांशी माझे संबंध असल्याचे सांगितले. तसेच तुम्ही पोस्ट केलेल्या ग्रुपचा मी एडमिन आहे त्या ग्रुप मधून तुम्ही पोस्ट डिलीट करा अन्यथा मी तुम्हाला रिमूव करतो अशी धमकी देत,त्या प्रतिनिधीस रिमूव करून टाकले.
देगलूरच्या या पत्रकाराची माहिती काढली असता तो पत्रकार दिवसभर पत्रकारितेची आयडी गळ्यात घालून फिरतो.तसेच दिवसाढवळ्या पाणी पिऊन शाळेमध्ये येतो त्याला शिक्षण संस्थेच्या संस्थाचालकाचे पाठबळ असल्याने तो एखाद्या वेळेस जास्त पाणी पिऊन आलेल्या अवस्थेत देखील त्याच्याकडे कानाडोळा केला जात असल्याची माहिती देगलूर मधील प्रतिष्ठित नागरिक, पत्रकारांनी दिली आहे तर फक्त दिवस-रात्र मी पत्रकार आहे म्हणत मी तोऱ्यात राहणाऱ्या अश्या या पत्रकाराबद्दल लिहावं तेवढं कमीच आहे. असो मात्र पत्रकारांनी पत्रकारिताच करावी ना की कुणाची चापलुसी आणि हमाली करू नये. अश्या एखाद्या चापलुसी करणाऱ्यामुळे सर्वच पत्रकारांची प्रतिमा खराब होतं असते.
Post Views: 145
