पर्यटन विकास, जलसंधारणावर भर;मडकीत केली स्थळ पाहणी:जिल्हाधिकारी येरेकरांनी विकासकामांची घेतली माहिती
![]()
जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी चिखलदरा तालुक्यातील विविध विकासकामांची प्रत्यक्ष स्थळी जाऊन पाहणी केली. या पाहणीदरम्यान त्यांनी कामांचा दर्जा तपासून सर्व कामे विहित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले. मडकी (ता. चिखलदरा) येथे जिल्हा वार्षिक योजना व आदिव
.
जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी या दौऱ्यात जलजीवन मिशन अंतर्गत पूर्ण झालेल्या विहीर व पाण्याच्या टाकीची तसेच अस्तित्वातील पाणीपुरवठा योजनांचीही माहिती घेतली. मडकी येथील भेटीदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी स्थानिक सरपंच व ग्रामस्थांशी संवाद साधताना महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. जलसंधारणाची कामे केवळ पाणी साठवण्यापुरती मर्यादित न ठेवता, त्यांचा उपयोग पर्यटन वाढीसाठी आणि परिसराच्या सुशोभीकरणासाठी करावा, असे सांगितले. मौजे कोहाणा येथे मृद व जलसंधारण विभागामार्फत सुरू असलेल्या कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्याच्या (केटी वेअर) कामाची पाहणीही यावेळी करण्यात आली. हे काम तांत्रिक निकषांनुसार आणि दर्जेदार करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. जिल्हाधिकारी येरेकर म्हणाले की, सर्व विकासकामे ही नियोजनबद्ध आणि भविष्यातील गरजा लक्षात घेऊन असावीत. जलसंधारणाच्या दर्जेदार कामांमुळे भूजल पातळीत वाढ होऊन त्याचा थेट फायदा शेतकऱ्यांना सिंचनासाठी होईल. पाणीटंचाई दूर करण्यासोबतच ही ठिकाणे पर्यटन स्थळ म्हणून विकसित झाल्यास परिसराचा आर्थिक कायापालट होण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. या पाहणी दौऱ्यात जिल्हा प्रशासनातील विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, अभियंता व कर्मचारी उपस्थित होते. पाणी टंचाईवर कायमस्वरूपी मात करुन जिल्ह्याची सिंचन क्षमता वाढवण्यासाठी ‘जलयुक्त शिवार अभियान’ प्रभावीपणे राबवण्यात येत आहे. या अभियानांतर्गत पावसाचे पाणी अडवणे, भूजल पातळी वाढवणे, शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करणे आणि जमिनीचा पोत सुधारणे या त्रिसूत्रीवर भर देण्यात येत असून या उन्हाळ्यात विविध यंत्रणांमार्फत मोठ्या प्रमाणावर कामांचे नियोजन केले आहे. विविध यंत्रणांना ५९७ कामांसाठी प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे. यामध्ये भूजल सर्वेक्षण यंत्रणेमार्फत ६०३ कामांसाठी ५ कोटी १५ लाख रुपये, मृद व जलसंधारण विभाग (जिल्हा परिषद) अंतर्गत ११ कामांसाठी १ कोटी ६९ लाख रुपये, तर मध्यम व लघु पाटबंधारे विभाग अचलपूर अंतर्गत ४ कामांसाठी एक कोटी २८ लाख रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे.
जलयुक्त शिवारच्या ५९७ कामांना मान्यता
