सायबर चोरट्यांकडून दोन तरुणींची फसवणूक:भेटवस्तूंच्या आमिषाने इन्स्टाग्रामवरून १२.८५ लाखांची केली फसवणूक

0
bc3e9e93-1359-403c-b605-3b612d22c299_1778323349302.jpg




पुण्यात इन्स्टाग्रामवर सायबर चोरट्यांनी दोन तरुणींना भेटवस्तूंच्या आमिषाने १२ लाख ८५ हजार रुपयांचा गंडा घातला आहे. सोशल मीडियावरील ओळखीमुळे ही फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. पहिल्या घटनेत, हडपसर येथील हांडेवाडी रस्त्यावर राहणाऱ्या ४० वर्षीय महिलेची ७ लाख १५ हजार रुपयांची फसवणूक झाली. सायबर चोरट्यांनी इन्स्टाग्रामवरून ओळख करून इंडोनेशियातून भेटवस्तू पाठवल्याचे सांगितले. या भेटवस्तूंमधील डॉलर रोखीत बदलून देण्याच्या बहाण्याने महिलेला पैसे भरण्यास सांगितले. याप्रकरणी महिलेने काळेपडळ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी सायबर चोरट्यांविरोधात फसवणुकीसह माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा नोंदवला आहे. पोलिस निरीक्षक (गुन्हे) एस. बाबर या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. दुसऱ्या एका घटनेत, वाघोली परिसरात राहणाऱ्या ३५ वर्षीय तरुणीची ५ लाख ७० हजार रुपयांची फसवणूक झाली. या तरुणीला राहुल सिंगानिया नावाच्या व्यक्तीने इन्स्टाग्रामवर लग्नाचे आमिष दाखवले होते. त्यानंतर भेटवस्तू पाठवण्याच्या बहाण्याने तिच्याकडून पैसे उकळण्यात आले. याप्रकरणी वाघोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, वरिष्ठ पोलिस निरीक्षक गायकवाड पुढील तपास करत आहेत. हातउसने पैशांच्या वादातून तरुणाचा खुनाचा प्रयत्न हातउसने दिलेल्या पैशांच्या वादातून तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आल्याची घटना शनिवारवाड्याजवळील भुयारी मार्गात घडली. खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी एकाला विश्रामबाग पोलिसांनी अटक केली. नागार्जुन कोंडा रेड्डी (वय २५) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी छोटे उर्फ सूरज वर्मा (वय २४ ) याला अटक करण्यात आली. या प्रकरणी त्याच्याबरोबर असलेल्या एका साथीदाराविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत रेड्डी याची पत्नी रिना (रा. शुक्रवार पेठ पोलीस चौकीजवळ) हिने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी वर्मा हा कचरा वेचक आहे. रेड्डी याने त्याला हातउसने पैसे दिले होते. हातउसने पैसे परत मागण्यावरुन त्यांच्यात वाद झाले होते. शनिवारवाड्याजवळ असलेल्या भुयारी मार्गात सायंकाळी पावणेसातच्या सुमारास रेड्डी आणि वर्मा यांच्यात वाद झाले. वादातून यादव आणि त्याच्याबरोबर असलेल्या एकाने रेड्डी याला मारहाण केली. त्याच्यावर कटरने वार केल्याने तो गंभीर जखमी झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी अवस्थेतील रेड्डी याला ससून रुग्णालयात दाखल केले. पसार झालेल्या आरोपीला अटक करण्यात आली असून, पोलीस उपनिरीक्षक गायत्री पाटील तपास करत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed