11 शाळांचा निकाल 100 टक्के:दर्यापूर तालुक्याचा 92.83 टक्के निकाल; 2139 विद्यार्थी झाले उत्तीर्ण, यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळा प्रशासनाकडून स्वागत‎

0
transfar_240_177825857869fe1292dae1a_img20260508wa.jpg




माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या दहावीच्या परिक्षेचा निकाल शुक्रवारी ८ मे रोजी दुपारी आँनलाईन जाहीर झाला आहे. या निकालात दर्यापूर तालुक्याचा निकाल ९२.८३ टक्के लागला आहे. परिक्षेत बसलेल्या २३२३ विद्यार्थ्यांपैकी २१३९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. आदर्श हायस्कूल, दर्यापूरचा निकाल १०० टक्के लागला असून प्रबोधन विद्यालयाने ९५.४९ टक्के निकाल मिळवला आहे. दारापूर हायस्कूल, दारापूरचा निकाल ८९.३६ टक्के तर काशीबाई अग्रवाल विद्यालय, येवदा येथे ९७.२२ टक्के निकाल लागला. खल्लार हायस्कूल, खल्लारचा निकाल ९३.७५ टक्के, रत्नाबाई राठी हायस्कूल, दर्यापूरचा ९६.१५ टक्के तसेच एम. एन. उर्दू हायस्कूल, टाकळी पूर्णाचा निकाल ९७.९१ टक्के लागला. विकास विद्यालय, वडनेर गंगाईने ९३.१० टक्के निकाल मिळविला. श्री शिवाजी हायस्कूल, भामोदचा निकाल ९० टक्के तर राष्ट्रीय विद्यालय, तोंगलाबादचा ८८.३७ टक्के लागला. सुबोध विद्यालय, कळाशीने ८९.४७ टक्के, परशराम महाराज विद्यालय, पिंपळोदने ७३.५२ टक्के निकाल मिळविला. मौलाना आझाद नगरपरिषद उर्दू हायस्कूल, दर्यापूरचा निकाल ९५.९१ टक्के लागला. याशिवाय श्री तुळशीरामजी पाटील विद्यालय, नालवाडा ९० टक्के, श्री गाडगेबाबा माध्यमिक आश्रम स्कूल, आमला ९७.५० टक्के, श्री शिवाजी हायस्कूल, रामतीर्थ ८१.८१ टक्के, श्रीमती कोकीळाबाई गावंडे विद्यालय, बाबळी बनोसा ७३.३३ टक्के, जवाहरलाल विद्यालय, आराळा ८७.५० टक्के निकाल लागला. गिरीजा शंकर विद्यालय, चंडिकापूरचा निकाल ८४.३७ टक्के, श्री संत लहानुजी महाराज विद्यालय, लोतवाडा ८१.४८ टक्के लागला. ज्योती विद्यालय, अशोकनगर दर्यापूरने ६२.५० टक्के निकाल मिळविला. मौलाना आझाद उर्दू मुलींची शाळा, दर्यापूरचा निकाल ९७.४३ टक्के तर एस. ए. खान मुलींची शाळा, येवदाचा ९६.१५ टक्के लागला. गयाबाई राऊत विद्यालय, येवदा ९५.२३ टक्के, स्व. त्र्यंबकराव उपाख्य बाबासाहेब गावंडे विद्यालय, सांगळूद ७३.९१ टक्के तसेच महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय, मार्कंडाचा निकाल ८८.२३ टक्के लागला. ज्ञानपीठ कॉन्व्हेंट, दर्यापूरने ९६.२९ टक्के, पनोरा माध्यमिक विद्यालय, पनोराने ५७.१४ टक्के, मौलाना आझाद उर्दू हायस्कूल, वडनेर गंगाईने ९५.२३ टक्के तर माध्यमिक विद्यालय, कन्होलीने ७७.७७ टक्के निकाल नोंदविला. बसवंतराव वानखडे विद्यालय, लेहेगावचा निकाल ९१.१७ टक्के, उर्दू माध्यमिक विद्यालय, सासन रामापूरचा ८७.५० टक्के, माध्यमिक विद्यालय, अडुळा बाजारचा ८९.६५ टक्के तसेच पुंडलिकराव कराळे विद्यालय, सांगवा बु.चा निकाल ८५.७१ टक्के लागला आहे. या शाळांचा १०० % निकाल श्री एम.बी. पवार विद्यालय नांदेड बुद्रुक, श्री गुरुदेव विद्यालय नरदोडा, नारायण गुरु महाराज माध्यमिक विद्यालय गायवाडी, जनता विद्यालय उमरी बाजार, प्रगती विद्यालय वरुड बुद्रुक, शालिग्रामजी सावरकर विद्यालय सासन-रामापूर, झामाजी वाकपांजर विद्यालय थिलोरी, एस.ए. उर्दू गर्ल्स हायस्कूल दर्यापूर, गॉड कृष्णा इंग्लिश पब्लिक स्कूल तसेच केशरबाई सिकची विद्यालय दर्यापूर या शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed