व्यवसायात 20 टक्के भागीदारीचे आमिष; 30 लाखांची फसवणूक
नांदेड (प्रतिनिधी) -व्यवसायात 20 टक्के भागीदारी देण्याचे आमिष दाखवून 30 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 12 जानेवारी 2025 ते 25 मार्च 2026 या कालावधीत कोटा व नेलरी तरेडा परिसरात शेख नूर अहमद शेख (रा. पोचमपाड, जि. निजामाबाद) यांनी फिर्यादीचा विश्वास संपादन करून व्यवसायात भागीदारी देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर रोख व ऑनलाइन पद्धतीने एकूण 30 लाख रुपये स्वीकारले. मात्र, आश्वासनाप्रमाणे कोणताही लाभ न देता फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
याबाबत रामचंद्र तुकाराम मलोटेवार (वय 64, रा. विकासनगर, कोटा, जि. नांदेड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 754/2026 दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 च्या कलम 316(2) आणि 318(4) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चव्हाण करीत आहेत.
Post Views: 102
