कलिंगड खाऊन मृत्यूप्रकरणात पुन्हा ट्विस्ट:घरात सापडलेले औषण उंदीर पळवण्याचे; मग शरीरात 'झिंक फॉस्फाइड' आले कुठून?

0
db-temp-cover-marathi-2026-05-08t215952972_1778257833.jpg




मुंबईच्या पायधूनी येथील डोकाडिया कुटुंबातील चार सदस्यांच्या मृत्यू प्रकरणाच्या तपासात आता एक मोठी माहिती समोर आली आहे. यापूर्वी उंदीर मारण्याच्या औषधामुळे या चौघांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात होता. मात्र, पोलीस तपासात डोकाडिया यांच्या घरातून जे औषध जप्त करण्यात आले, ते उंदीर ‘मारण्याचं’ नसून केवळ ‘पळवण्याचं’ असल्याचं निष्पन्न झालं आहे. या औषधात विषारी ‘झिंक फॉस्फाइड’ नसल्याने आता या मृत्यूंमागे घातपात आहे का? असा संशय बळावला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डोकाडिया यांच्या घरात सापडलेलं उंदीर पळवण्याचं औषध हे नैसर्गिक पेपरमिंट-आधारित द्रव्य आहे. या औषधात मानवी जीवाला घातक ठरेल असं ‘झिंक फॉस्फाइड’ नसतं. मात्र, कलिना येथील एफएसएल (FSL) लॅबमध्ये जेव्हा मृतदेह आणि त्यांनी खाल्लेल्या कलिंगडाचे नमुने तपासण्यात आले, तेव्हा त्यात स्पष्टपणे झिंक फॉस्फाइड आढळलं. जर घरात विषारी औषध नव्हतं, तर कलिंगडात आणि चौघांच्या शरीरात हे विष आलं कुठून? हा प्रश्न आता पोलिसांना सतावत आहे. इ २६ तारखेला रात्री डोकाडिया कुटुंबाने एकत्र कलिंगड खाल्ले होते. त्यानंतर अवघ्या काही तासांतच कुटुंबातील प्रमुख अब्दुल्ला डोकाडिया (४४), त्यांची पत्नी नसरीन (३५), मुलगी आयेशा (१६) आणि झैनब (१३) या चौघांना उलट्यांचा त्रास सुरू झाला. त्यांना तातडीने फॅमिली डॉक्टर आणि नंतर रुग्णालयात नेण्यात आले, पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. सुरुवातीला कलिंगडाच्या भेसळीमुळे मृत्यू झाल्याचा संशय होता, पण कलिंगडात भेसळ आढळली नव्हती. घातपात की आत्महत्या? फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या मते, झिंक फॉस्फाइड हे अत्यंत जहाल विष असून त्याचा वापर उंदीर मारण्यासाठी केला जातो. हे विष शरीरात गेल्यामुळेच या चौघांचा मृत्यू झाला हे आता स्पष्ट झालं आहे. मात्र, हे विष त्यांनी स्वतःहून घेतलं की त्यांच्या अन्नातून कोणीतरी दिलं, याचा शोध पायधूनी पोलीस घेत आहेत. हे ही वाचा… भाजप पुरस्कृत पॅनेलच्या पराभवानंतर MMCची निवडणूक रद्द:विरोधकांकडून सरकारवर टीका, म्हणाले – हे प्रशासन नसून हुकूमशाही महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलच्या (MMC) निवडणुकीत सत्ताधारी भाजप समर्थित पॅनेलला मोठा धक्का बसल्यानंतर, राज्य सरकारने ही निवडणूक प्रक्रियाच रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. आता यापुढे कौन्सिलवर सदस्यांची निवड ही निवडणुकीद्वारे न होता थेट सरकारच्या ‘नामनिर्देशन’ पद्धतीने होणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे लोकशाहीचा खून होत असल्याची टीका विरोधी पक्षांकडून केली जात आहे. सविस्तर वाचा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed