'मिशन कर्मयोगी'मध्ये हिंगोली जिल्हा परिषदेचा डंका:हिंगोलीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा मुंबईत 'टेक वारी' कार्यक्रमात गौरव

0
new-project-2026-05-08t202852398_1778252495.jpg




केंद्र सरकारच्या मिशन कर्मयोगी उपक्रमांतर्गत साधना सप्ताहामध्ये हिंगोली जिल्हा परिषदे अंतर्गत ९५ टक्के कर्मचाऱ्यांनी विविध प्रशिक्षणे पूर्ण करून राज्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. यासप्ताहातील उत्कृष्ठ कामगिरी बद्दल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांचा शुक्रवारी ता. ८ मुंबई येथे टेक वारी या कार्यक्रमात गौरव करण्यात आला. या पुरस्कारामुळे हिंगोली जिल्हा परिषदेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. केंद्र सरकारने मिशन कर्मयोगी उपक्रमातील साधना सप्ताहात ता. २ ते ता. ८ एप्रील या कालावधीत साधना सप्ताह राबविण्यात आला. या सप्ताहात जिल्हा परिषद अंतर्गत कर्मचाऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी करून एआय च्या प्रशिक्षणासोबतच इतर चार तासाचे प्रशिक्षण पूर्ण करण्याबाबत कळविण्यात आले होते. त्यानुसार हिंगोली जिल्हा परिषद अंतर्गत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी समृध्दी दिवाने, केशव गड्डापोड, विजय बोराटे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी दिगंबर माडे, जलसंधारण विभागाच्या कार्यकारी अभियंता प्रियंका राजपूत, समाज कल्याण अधिकारी गिता गुठ्ठे, शिक्षणाधिकारी आसावरी काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वच विभागांमधून सुमारे ५०९८ कर्मचाऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली होती. त्यापैकी ५०२२ कर्मचाऱ्यांनी कोर्सस पूर्ण केले. तर ४७२२ कर्मचाऱ्यांनी चार तासाचा कोर्स पूर्ण केला आहे. त्यामुळे राज्यात इतर जिल्ह्यांच्या तुलनेत हिंगोली जिल्हा परिषदेच्या ९५ टक्के कर्मचाऱ्यांनी कोर्सस पूर्ण करून राज्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. या प्रशिक्षणामुळे कर्मचाऱ्यांच्या कामकाजात सुधारणा येणार असून कामात गतीमानता व अचूक कामे होतील. त्यामुळे प्रशासन गतीमान होऊन नागरीकांची कामे जलदगतीने होण्यात मदत झाली आहे. दरम्यान, जिल्हा परिषदेच्या उत्कृष्ठ कामगिरीबद्दल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांना शासनाच्या सामान्य प्रशासनाच्या वतीने पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यानुसार आज मुंबई येथे मंत्रालयाच्या मुख्य इमारतीच्या त्रिमुर्ती प्रांगण येथे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री आशीष शेलार, अप्पर मुख्य सचिव व्ही.राधा यांची उपस्थिती होती. या पुरस्कारामुळे हिंगोली जिल्हा परिषदेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवल्या गेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed