महाविद्यालयीन विद्यार्थिनीची गल्लेबोरगावला आत्महत्या:मावशीच्या घरी एकटी असताना छताला घेतला गळफास
![]()
गंगापूर तालुक्यातील वसुसायगाव येथील रहिवासी व शिक्षणासाठी गल्लेबोरगाव येथे मावशीकडे वास्तव्यास असलेल्या २१ वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिनीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. निकिता नवनाथ नरोडे (२१, रा. वसुसायगाव, ता. गंगापूर, ह. मु. गल्लेबोरगाव) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. निकिता कन्नड तालुक्यातील जैतापूर येथील एका महाविद्यालयात बी.एस्सी. द्वितीय वर्षात शिक्षण घेत होती. गुरुवारी सकाळी अकरा वाजेच्या दरम्यान निकिताची मावशी व काका हे शेतातील कामासाठी बाहेर गेले. त्या वेळी घरात निकिता एकटीच होती. यावेळी तिने घरातील छताला लोखंडी अँगलला ओढणी बांधून गळफास घेत आत्महत्या केल्याचे समोर आले. काही वेळानंतर शेजारील नागरिकांच्या लक्षात हा प्रकार आला. त्यांनी तत्काळ घराकडे धाव घेतली व निकिताच्या मावशीला घटनेची माहिती दिली. ग्रामस्थांच्या मदतीने निकिताला खाली उतरवून तातडीने वेरूळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला मृत घोषित केले. या घटनेमुळे नातेवाईकांचा आक्रोश पाहून परिसरातील वातावरण भावनिक झाले होते. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच खुलताबाद ठाण्याचे कर्मचारी ए. एफ. अव्हाड यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.निकिताने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल कोणत्या तणावातून उचलले, याबाबत अद्याप कोणतीही स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. पोलिसांकडून नातेवाईकांचे जबाब नोंदविण्याचे काम सुरू असून आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. १२ वर्षांची असताना निकीता शिक्षणासाठी मावशीकडे निकिता १२ वर्षांची असताना शिक्षणासाठी मावशीकडे गल्लेबोरगाव येथे राहण्यास आली होती. सध्या ती कन्नड तालुक्यातील जैतापूर येथील एका महाविद्यालयात बी.एस्सी. द्वितीय वर्षात शिक्षण घेत होती. गुरुवारी सकाळी अकरा वाजेच्या दरम्यान निकिताची मावशी व काका हे नेहमीप्रमाणे शेतातील कामासाठी बाहेर गेले होते. त्या वेळी घरात निकिता एकटीच होती. याच संधीचा फायदा घेत तिने राहत्या घरातील छताला असलेल्या लोखंडी अँगलला ओढणी बांधून गळफास घेत आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.
