Maharashtra 10th Board Exam Results Today 1 PM
![]()
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्च महिन्यात घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा (SSC) निकाल आज अधिकृतपणे जाहीर केला. यंदा राज्याचा एकूण निकाल 92.09 टक्के लागला असून, दरवर्षीप्रमाणे यंदाही निकालाच्या शर्यतीत मुलींनीच बाजी मारली आ
.
मंडळाने सुरुवातीला दुपारी 1 वाजता निकाल ऑनलाईन पाहता येईल असे जाहीर केले होते. मात्र, ऐनवेळी संकेतस्थळावर (वेबसाईट) वाढणारे ट्रॅफिक आणि विद्यार्थ्यांची उत्सुकता लक्षात घेता, मंडळाने तातडीचा निर्णय घेत सकाळी 11:30 वाजल्यापासूनच निकाल पाहण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे, अशी माहिती त्रिगुण कुलकर्णी यांनी दिली.
पुढील प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ मिळावा, या उद्देशाने यंदा बोर्डाने परीक्षा 10 दिवस आधीच घेतली होती. संपूर्ण राज्यात अत्यंत निकोप आणि शिस्तबद्ध वातावरणात ही परीक्षा पार पडली. राज्यातील लाखो पालकांचे आणि विद्यार्थ्यांचे लक्ष लागून राहिलेल्या या निकालाने आता अकरावी प्रवेशाचा मार्ग मोकळा केला आहे.
मुलींचे वर्चस्व
मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण 94.96 टक्के असून मुलांचे प्रमाण 89.56 टक्के इतके आहे. मुलांच्या तुलनेत मुलींचा निकाल 5.40 टक्क्यांनी अधिक लागला आहे.
कोकणची बाजी
विभागावार निकालात 97.62 टक्क्यांसह कोकण विभागाने पुन्हा एकदा राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
संभाजीनगर सर्वात मागे
राज्यातील सर्वात कमी निकाल छत्रपती संभाजीनगर विभागाचा (88.41 टक्के) लागला आहे.
100 टक्के विषय
एकूण 64 विषयांपैकी 20 विषयांचा निकाल 100 टक्के लागला आहे.
असा आहे विभागानुसार निकाल
कोकण: 97.62 टक्के
कोल्हापूर: 95.47 टक्के
मुंबई: 94.97 टक्के
पुणे: 94.24 टक्के
नाशिक: 90.53 टक्के
अमरावती: 90.50 टक्के
नागपूर: 89.07 टक्के
लातूर: 88.42 टक्के
छत्रपती संभाजीनगर: 88.41 टक्के
येथे पाहा निकाल
mahahsscboard.in
sscresult.mkcl.org
https://sscresult.mahahsscboard.in/
https://results.targetpublications.org/
https://results.digilocker.gov.in
वर दिलेल्या संकेतस्थळांवर दहावीचा निकाल पाहता येणार आहे.
दरम्यान, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने गेल्या काही वर्षांपासून दहावी आणि बारावीचे निकाल विक्रमी वेळेत जाहीर करण्याची आपली परंपरा यंदाही कायम ठेवली आहे. पूर्वी जून महिन्यापर्यंत लांबणीवर पडणारे हे निकाल आता मे महिन्यातच हाती येत असून, बारावीचा निकाल 2 मे रोजी लागल्यानंतर आता दहावीचा निकालही आज जाहीर झाला आहे. या तत्परतेमुळे पुढील प्रवेश प्रक्रिया आणि नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात वेळेत होण्यास मोठी मदत होणार असून, दहावीच्या निकालापाठोपाठ आता अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेचा मार्गही मोकळा होणार आहे.
