मोठी बातमी:उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा हेलिकॉप्टर अपघात टळला; जुहू विमानतळावर आपत्कालीन लँडिंग

0
copy-of-db-temp-cover-marathi-2026-05-07t173645661_1778155762.jpg




उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरचा मोठा अपघात टळल्याची माहिती समोर आली असून, महालक्ष्मी रेसकोर्स येथून मुरबाडमधील एका लग्नसोहळ्यासाठी जात असताना त्यांचे हेलिकॉप्टर कल्याण परिसरात अचानक आलेल्या वादळात अडकले. सुदैवाने, पायलटने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे आणि सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला असून हेलिकॉप्टरमधील सर्वजण पूर्णपणे सुरक्षित आहेत. या थरारक घटनेनंतर उपमुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरचे जुहू विमानतळावर तातडीने आपत्कालीन लँडिंग करण्यात आले असून, या प्रसंगावधानामुळे मोठा धोका टळला आहे. ही बातमी आम्ही अपडेट करत आहोत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed