वानवडीत 45 मीटर उंचीचा तिरंगा ध्वज फडकला:काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते लोकार्पण

0
31fd86e6-8ec8-46bc-8102-dcbe7fd65425_1778157410204.jpg




वानवडी येथील संविधान चौकात ४५ मीटर उंचीच्या तिरंगा ध्वजस्तंभाचे लोकार्पण करण्यात आले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते हा ध्वज फडकावण्यात आला. माजी महापौर प्रशांत जगताप आणि माजी नगरसेविका रत्नप्रभा जगताप यांच्या प्रयत्नातून हा ध्वजस्तंभ उभारण्यात आला आहे. राज्य राखीव पोलीस दल आणि लष्कर भागाच्या मध्यभागी असलेल्या संविधान चौकात हा ध्वजस्तंभ उभा करण्यात आला आहे. यावेळी बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, सध्या राज्यात आणि देशात जात, धर्म व समाज विभागण्याचे कारस्थान सुरू आहे. अशा ‘गढूळ’ वातावरणात तिरंगा ध्वज संविधानाचा मार्ग दाखवेल, असे त्यांनी नमूद केले. ध्वजस्तंभ लोकार्पण सोहळ्याच्या समारोपावेळी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात सपकाळ यांनी भाजपच्या राजकारणावर टीका केली. पुणे शहरात लैंगिक अत्याचार, ड्रग्ज, कोयताधारी टोळ्या आणि इतर गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असून, गृहमंत्र्यांच्या कामकाजावर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यावेळी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे, माजी राज्यमंत्री रमेश बागवे, नगरसेवक साहिल केदारी यांच्यासह काँग्रेसचे आजी-माजी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि वानवडी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. देवाची उरुळीत गार्डन वेस्ट प्रकल्पासाठी ५३ लाखांच्या खर्चास मंजुरी +स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले देवाची उरुळी येथे गार्डन वेस्ट प्रक्रिया प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक स्थापत्य दुरुस्तीच्या कामास महापालिकेने मंजुरी दिली आहे. घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या या कामासाठी ५३ लाख ५२ हजार रुपयांचा खर्च अपेक्षित असून, संबंधित प्रस्तावाला स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिली. या कामासाठी मे. पूजा कन्स्ट्रक्शन, हडपसर या कंपनीची निवड करण्यात आली आहे. कंपनीने ४५ लाख २४ हजार रुपयांची निविदा सादर केली असून, ती अंदाजपत्रकाच्या तुलनेत ३३.१५ टक्के कमी असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. जीएसटी, मटेरिअल टेस्टिंग शुल्क आणि अन्य आकारांसह एकूण खर्च ५३ लाख ५२ हजार रुपयांपर्यंत जाणार आहे. घनकचरा व्यवस्थापन विभागाने या कामासाठी ७९ लाख ९९ हजार रुपयांचे पूर्वगणनपत्रक तयार केले होते. १२ नोव्हेंबर २०२५ रोजी खातेप्रमुखांनी त्यास मान्यता दिल्यानंतर ६७ लाख ६८ हजार रुपयांच्या कामासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. १५ नोव्हेंबर २०२५ रोजी विविध वृत्तपत्रांमध्ये निविदा प्रसिद्ध करण्यात आली होती. २५ नोव्हेंबरपर्यंत निविदा स्वीकारण्यात आल्या असून, एकूण सात पात्र निविदा प्राप्त झाल्या होत्या. महापालिकेच्या माहितीनुसार, उरुळी देवाची येथील कात्रज बायपास-सासवड रस्त्यालगतची जागा घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या ताब्यात देण्यात आली आहे. या ठिकाणी गार्डन वेस्टचे संकलन, वर्गीकरण आणि प्रक्रिया करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed