देशात आग लावून निवडणुका जिंकण्याचा भाजपचा प्लॅन:देशभरात 'कोश्यारी' नेमून लोकशाहीची गळचेपी, हिंदुत्वाच्या सातबाऱ्यावर केवळ भाजपचे नाव नाही- संजय राऊत
![]()
ट्रम्प यांनी धमकी दिल्याने ऑपरेशन सिंदूर थांबवले, आमच्या सत्ताधाऱ्यांनी इराणकडून काही धडे घेतले पाहिजे, असे उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. तर केंद्र सरकारला वाटते की पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार घडला पाहिजे आणि त्याचे लोण देशभरात गेले पाहिजे ही येणाऱ्या निवडणुकीची भाजपकडून तयारी सुरू आह, असेही राऊत यांनी म्हटले आहे. संजय राऊत म्हणाले की, पश्चिम बंगालमध्ये घटनात्मक पेच निर्माण होईल का या विषयी मी आताच सांगू शकत नाही. पण राज्यपाल आणि देशाचे गृहमंत्री कोणत्याही थराला जावू शकतात. ममता बॅनर्जी यांची भूमिका स्पष्ट आहे की मी निवडणूक हरले नाही कपट रचून माझा पराभव घडवण्यात आला, 100 जागा लुटल्या गेल्या 90 लाख मते कापली गेली. त्यातील 27 लाख मतांचा विषय कोर्टात प्रलंबित आहे. याच मताचे अंतर बॅनर्जी आणि भाजपमध्ये आहे. ममता बॅनर्जी या फार मोठे आंदोलन करणाऱ्या नेत्या आहेत. सत्तेवर असताना नसताना त्यांनी आंदोलने केली आहेत. बंगालमध्ये हिंसाचार उसळला असून आतापर्यंत 7 जणांचा बळी गेला आहे. अनेक ठिकाणी आग लागली आहे. भाजपला देशभरात आग लावायची आहे, दोन वर्षांमध्ये सर्व देशात आग लागली की लोकसभा निवडणूक घ्यायची हा त्यांचा प्लॅन आहे. निवडणुकीची तयारी सुरू संजय राऊत म्हणाले की, पंजाबमध्ये आजपर्यंत स्फोट झाले नाही काल तिथे स्फोट झाला. पंजाबचे मुख्यमंत्री म्हणाले की भाजपने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. स्फोट त्यांचे उदाहरण आहे. बंगालमधील हिंसाचारास केंद्र सरकार जबाबदार आहे. तामिळनाडूमध्ये परिस्थिती वेगळी आहे, तिथे राज्यपालांनी सर्वांत मोठ्या पक्षाला सत्तास्थापनेसाठी आमंत्रित केलेले नाही. भाजपने देशभरात कोश्यारी नेमले आहेत असे म्हणत राऊतानी तामिळनाडूच्या राज्यपालांवर टीका केली आहे. काळाराम मंदिर शाहु-फुले-आंबेडकर विचारधारेशी जोडलेले संजय राऊत म्हणाले की, माजी राष्ट्रपती यांच्या हातून काळाराम मंदिरावर धर्म ध्वजा फडकावत भाजपने हिंदुत्वावर ताबाच घेतला. भाजपला असे वाटते की जगातील हिंदुत्वाचे ते एकमेव ठेकेदार आहेत आणि हिंदु्त्वाच्या सातबाऱ्यावर केवळ त्यांचेच नाव आहे. काल ऐतिहासिक काळाराम मंदिरावर धर्म ध्वजा फडकवण्याचे कार्यक्रम झाला आम्ही त्याचे स्वागत करतो. याकार्यक्रमाला माजी राष्ट्रपती, राज्याचे मुख्यमंत्री, कुंभमेळा मंत्री आणि नरहरी झिरवाळ उपस्थित होते, महान धर्मरक्षक उपस्थित होते. धर्म ही काय त्यांची मक्तेदारी आहे का? काळाराम मंदिराचा संबंध शाहु-फुले-आंबेडकर विचारधारेशी जोडलेला आहे. या कुटुंबातील कोणाला तरी तिथे बोलावले पाहिजे होते. या कार्यक्रमासाठी ठाकरेंना तरी बोलवायला हवे होते. महत्त्व माहिती नसताना हे कार्यक्रम हिंदुत्वसाठी योग्य नाही. नाशिकमध्ये 2029 चे काम सुरू झाले आहे. पुढच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी तयारी सुरू करण्यात आलेली आहे. हिंदुत्वाला बदनाम करू नका संजय राऊत म्हणाले की, अयोध्येत सुद्धा अशाच प्रकारची ध्वजा फडकवण्यात आली.त्यावर एक बहरलेले वृक्ष आहे. पण देशात काय परिस्थिती आहे तर अदानीसाठी जंगलतोड सुरू आहे. ज्या जंगलात त्यांना खानी देण्यात आल्या आहेत त्या ठिकाणी जंगलतोड मोठ्या प्रमाणात सुरू आहे. आरेमध्ये एका रात्रीत 3 हजार झाडे तोडली गेली. धर्म ध्वजावर जे प्रतिके टाकतात तसे वागत नाही. इथेसुद्धा हनुमानचे चित्र धर्म ध्वजावर घेतले आहे. हनुमान हे निष्ठावान होते पण यांनी सर्व गद्दार यांच्या पक्षात घेतले आहेत. तुमच्या पक्षात कोण लोकं आहेत ते काय हनुमान आहेत का? नाहीत आमचे सर्व हनुमान तुम्ही घेतले. हे सर्व खेळ करत हिंदुत्वाला बदनाम करू नका. गुजरातच्या ठेकेदारांनाच पैसे द्यायचे संजय राऊत म्हणाले की, कुंभमेळ्यासाठी 3 लाख कोटी रुपयांचे बजेट आहे असे मी वाचले ते खरे की खोटे मला माहिती नाही. पण इतक्या पैशाचे काय कामे करणार असा सवाल राऊत यांनी केला आहे. आकडा चुकला असेल पण हे 3 लाख कोटींचा आकडा करू शकतात कारण पैसे गुजरातच्या ठेकेदारांनाच द्यायचे आहे. कुंभमेळा मंत्र्यांनी सांगितले पाहिजे की 35 हजार कोटी रुपयांची नेमकी काय कामे ते करणार आहेत. नाशिक पालिकेवर याची काय जबाबदारी आहे ते काही नाही.
