ममता बॅनर्जी हरल्या नाहीत, केंद्राने त्यांना दहशतीने रोखले:संजय राऊत यांचा आरोप; हिंदीला विरोध नाही, पण मराठी राज्याची प्रथम भाषा
![]()
आमचा हिंदी भाषेला विरोध नाही पण राज्याची पहिली भाषा ही मराठी आहे. हिंदी, इंग्रजी या भाषा राष्ट्रीय स्तरावर काम करण्यासाठी गरजेच्या आहेत, असे उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. संजय राऊत म्हणाले की, सरकारमधील काही लोकांना लोकशाहीचे हे पतन मान्य नाही. सरकारच्या हुकुमशाहीविरोधात आघाडीने एकत्र येणं गरजेचे आहे. जसे इंदिरा गांधी यांनी लावलेल्या आणीबाणीला त्यावेळसच्या काँग्रेस नेत्यांचा विरोध होता त्यांनी पक्ष सोडून गांधींच्या निर्णयाविरोधात लढण्याची भूमिका घेतली. असे काही लोकं आजही सत्ताधारी पक्षात आहे, त्यांनासुद्धा आम्ही आवाहन करणार आहोत. संजय राऊत म्हणाले की, ममता बॅनर्जी यांचा पराभव झालेला नाही असे मत त्यांनी व्यक्त केले त्या मताशी आम्ही सहमत आहोत. पश्चिम बंगालमध्ये मोदी, शहीा यांनी इराण युद्धाप्रमाणे परिस्थिती निर्माण केली. सैन्य, दहशत, आर्थिंक दहशतवाद, अफवा आणि संपूर्ण केंद्र सरकार पश्चिम बंगालमध्ये बसले, याद्या बदलल्या आणि ममता बॅनर्जी यांचा पराभव करायचाच या द्वेषाने निवडणूक लढवत त्यांना सत्तेत येण्यापासून रोखले. त्या जिंकलेल्याच आहेत हे खरे आहे. ममता बॅनर्जी काय आहे हे देशाला माहिती आहे. मी राजीनामा देणार नाही हे ममता बॅनर्जी यांचे वक्तव्य सरकारविरोधी आंदोलनाचाच एक भाग आहे. आघाडीचे नेते बॅनर्जींसोबत संजय राऊत म्हणाले की, इंडिया आघाडीचे सर्व नेते त्यांच्या सोबत आहे. उद्धव ठाकरेंची सुद्धा भूमिका तीच आहे. जवळपास आघाडीच्या सर्वच नेत्यांनी त्यांना फोन करत पाठिंबा दर्शवला आहे. जर आम्हाला हुकुमशाहीविरोधात लढायचे असेल तर एकत्र यावे लागेल. ज्या पद्धतीने निवडणूक आयोग सत्ताधारी पक्षाचा गुलाम झाला आहे, त्याचा विचार केला तर विरोधी पक्षाने निवडणूक लढवायची का नाही ही भूमिका घ्यावी हे ठरवावे लागेल. त्यासाठी विरोधी पक्षाला एकत्र यावे लागेल. नीतिशकुमार पहिल्यापासूनच भरकटलेले संजय राऊत म्हणाले की, नीतिशकुमार हे पहिल्यापासूनच भरकटलेले होते.ते कधीच कुठे स्थिर नव्हते. त्यांचे मानसिक संतुलन किती बिघडले हे आपण सर्व जण पाहत असतात. ते सोडून जाणार हे ममता बॅनर्जी यांनी पहिल्याच बैठकीत सांगितले होते. इंडिया आघाडीचे समन्वयक म्हणून नीतिश कुमार यांची निवड करावी अशी मागणी काही जणांनी केली होती. पण तेव्हा ते जाणार हे ममता बॅनर्जी यांनी सांगितले होते. ..तर बंगालमध्ये परिस्थिती बदलली असती संजय राऊत म्हणाले की, ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसला सांभाळून घेतले असते तर निकाल वेगळा लागला असता. कधी काळी त्यांचा ही मुख्यमंत्री पश्चिम बंगालमध्ये होते. देशाचे राष्ट्रपती असलेले प्रणव मुखर्जी हे सुद्धा पश्चिम बंगालचेच. आम्ही सर्वांना एकत्र येण्यासाठी आवाहन केले आहे. कारवाई केली पाहिजे संजय राऊत म्हणाले की, लाडक्या बहीण योजनेचे पैसे चुकीच्या मार्गाने कुणाच्या खिशात गेले असतील तर तो गुन्हा आहे, सरकारला हे कळत असेल तर त्यावर कारवाई झाली पाहिजे.
