उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दिल्ली दौऱ्यावर:राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा देण्याची शक्यता; भाजप नेत्यांचीही भेट घेण्याचा अंदाज

0
copy-of-db-temp-photo-resize-marathi-2026-05-04t13_1778055477.png




सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज दिल्ली दौऱ्यावर गेल्यात. त्या तिथे राज्यसभेच्या सभापतींची भेट घेऊन आज आपल्या राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा देण्याची दाट शक्यता आहे. याशिवाय त्या भाजप पक्षश्रेष्ठींचीही भेट घेतील असा अंदाज आहे. सुनेत्रा पवार यांनी नुकत्याच झालेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत उल्लेखनीय विजय मिळवला. त्यानंतर दोन दिवसांतच त्या दिल्ली दौऱ्यावर गेल्या आहेत. विशेष म्हणजे सुनेत्रा पवार सध्या राज्यसभेच्या सदस्या आहेत. मात्र, एकाच वेळी विधानसभा व राज्यसभा या दोन्ही सभागृहांचे सदस्यत्व ठेवता येत नसल्याने त्या आज राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा देतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. दिल्ली दौऱ्यात त्या राज्यसभेच्या सभापतींची भेट घेऊन औपचारिक प्रक्रिया पूर्ण करू शकतात. हा राजीनामा दिल्यास त्यांच्या पुढील राजकीय भूमिकेचा मार्ग अधिक स्पष्ट होईल. दिल्ली दौऱ्यात त्या राज्यसभेच्या सभापतींची भेट घेऊन औपचारिक प्रक्रिया पूर्ण करू शकतात. हा राजीनामा केवळ तांत्रिक बाब नसून त्यांच्या पुढील राजकीय भूमिकेचे दिशादर्शन करणारा ठरू शकतो. विधानसभेतील सक्रिय राजकारणात अधिक लक्ष केंद्रित करण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. विशेषतः सुनेत्रा पवार यांच्या रिक्त जागेवर कुणाची नियुक्ती होणार? याची चर्चाही राजकारणात सुरू झाली आहे. भाजप नेत्यांची भेट घेण्याचाही अंदाज दिल्ली दौऱ्यात सुनेत्रा पवार भाजपच्या काही ज्येष्ठ नेत्यांचीही भेट घेतील, अशी चर्चा आहे. त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व भाजप अध्यक्ष नितीन नबीन यांची भेट घेण्याची चिन्हे आहेत. या संभाव्य भेटींमध्ये राज्यातील राजकीय घडामोडी, महायुती सरकारमधील समन्वय, आगामी निवडणुकांची तयारी आणि धोरणात्मक मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. तथापि, या भेटींबाबत कोणतीही अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. तरीही या चर्चांमुळे राजकीय वर्तुळात उत्सुकता वाढली आहे. दौऱ्याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष सुनेत्रा पवार यांच्या दिल्ली दौऱ्याकडे राज्यातील सर्वच पक्षांचे लक्ष लागले आहे. त्यांच्या राजीनाम्याच्या निर्णयामुळे राज्यसभेतील जागेवरही परिणाम होणार आहे. तसेच, विधानसभेत त्यांच्या सक्रिय सहभागामुळे राज्यातील सत्तासमीकरणांवरही परिणाम होऊ शकतो. या दौऱ्यानंतर त्यांच्या पुढील राजकीय हालचाली काय असतील, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed