काँग्रेस म्हणजे मित्रपक्षांना गिळणारा अजगर!:ठाकरेंनी ममतांच्या घरात बसून आंदोलन करावं, सल्लागारांनी जरांगेंना चुकीची माहिती देऊ नये- नवनाथ बन

0
new-project-2026-04-28t115726138_1778051269.jpg




उद्धव ठाकरेंनी मातोश्रीतून बाहेर पडत कोलकत्यामध्ये जात ममता बॅनर्जी यांच्या घरात बसून एक वर्षभराचे आंदोलन करावे, कारण त्यांना घराबाहेर पडावे वाटत नाही, असा टोला भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी लगावला आहे. सत्ताधारी पक्षाचे सोडा संजय राऊत यांनी आपल्या पक्षाचे आमदार-खासदार यांच्याकडे लक्ष दिले पाहिजे. तुमच्या लोकांना काय त्रास आहे हे तुम्हाला माहिती नाही, एकनाथ शिंदे गेल्यावर तुम्हाला जाग येते असा टोलाही बन यांनी लगावला आहे. नवनाथ बन म्हणाले की, पश्चिम बंगालमध्ये इंडिया आघाडीचे काही अस्तित्वच नव्हते.ही अजेंडा नसलेली आघाडी आहे. त्यांच्याकडे ध्येय, धोरण नाही. म्हणून ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमध्ये एकट्याने निवडणूक लढवली आणि काँग्रेसला डावलले. काँग्रेसने पश्चिम बंगालमध्ये काय कामगिरी केली? असा सवाल बन यांनी केला आहे. जो जो पक्ष काँग्रेसच्या नादी लागला त्यांचे अस्तित्व संपवण्याचे काम काँग्रेसने केले आहे. काँग्रेस आपल्या सहकाऱ्यांना गिळत मोठे होण्याचा प्रयत्न करणारा अजगर आहे. तर संजय राऊत हे त्यांचे पिल्लू आहेत. कारण त्यांना खासदारकीची निवडणूक लढवायची आहे. जरांगेंच्या सल्लागारांनी चुकीची माहिती देऊ नये नवनाथ बन म्हणाले की, मनोज जरांगे यांच्या सल्लागाराने त्यांनी चुकीची माहिती देऊ नये. यापूर्वी सुद्धा ममता बॅनर्जी यांचा पराभव भाजपने केला होता. जरांगे पाटलांनी बंगालमध्ये जात माहिती घेतली असती तर बॅनर्जीची दहशत काय आहे हे त्यांना कळेल. मनोज जरांगे यांना माहिती देताना चांगली माहिती दिली पाहिजे. 5 वर्षांपूर्वीच भाजपने त्यांचा पराभव केला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कायद्याने चालतात. भोरमध्ये चिमुकलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणी आरोपीला फासावर चढवण्याचे काम करण्यात येईल. मनोज जरांगे यांनी या गोष्टीमध्ये राजकारण करू नये. उबाठाचा दिवा विझणार नवनाथ बन म्हणाले की, पश्चिम बंगालसह 3 राज्यात भाजपचा विजय झाल्यानंतर संजय राऊत म्हणाले की दिवा विजताना मोठा होतो, त्या पद्धतीने भाजपाचा हा विजय आहे. राऊत तुम्ही उबाठा गटाचे शेवटचे फडफडणारे दिवे आहात. उबाठा गटाला विझवित संजय राऊत नावाचा दिवा विझणार आहे हे महाराष्ट्रातील जनतेने ओळखले आहे. उबाठाची मशालीनंतर राऊतांचा दिवा विझणार आहे हे राऊतांनी काँग्रेसकडून सुपारी घेऊन ठरवले आहे.भाजपचा दिवा कधी विझणार नाही. बॅनर्जींची दादागिरी, गुंडगिरी जनतेने संपवली नवनाथ बन म्हणाले की, ममता बॅनर्जी यांना जनतेने घरी बसवले आहे, त्यांनी राजीनामा दिला काय आणि नाही काय याचा काही फरक पडत नाही. बॅनर्जी यांनी कधीही लोकांचा आदर केला नाही, त्यामुळे त्यांची ही भूमिका काही नवी नाही. ममतादीदींनी पश्चिम बंगालमध्ये गेली 15 वर्षे दादागिरी, गुंडगिरी केली आहे. आता जनतेने घरी बसवल्यावरही त्यांची दादागिरी करत आहेत आणि राऊत त्यांचे समर्थन करत आहेत. राऊतांनी ममता बॅनर्जी यांच्या आंदोलनात थेट पश्चिम बंगालमध्ये जात सहभागी झाले पाहिजे. ममता बॅनर्जींना विधानसभेत जाता येणार नाही नवनाथ बन म्हणाले की, संजय राऊत यांनी पश्चिम बंगालची तुलना इराण आणि इस्रायल युद्धाशी केली हे नशीब आहे नाहीतर त्यांनी पहिल्या, दुसऱ्या महायुद्धाशी तुलना केली असती. भाजप जिंकले की त्यांना युद्ध जिंकल्यासारखे वाटते.आम्ही जनतेची सेवा करतो म्हणून निवडणूक जिंकतो. तुमच्या नेत्यांसारखे आम्ही घरात बसून निवडणूक लढवत नाही, जनतेसाठी कायम काम करत असतो. ममता बॅनर्जी यांनी राजीनामा दिला नाही तरी काही फायदा नाही. त्या विधानसभेला पराभूत झाल्या आहेत त्यांना विधीमंडळात जाता येणार नाही. उद्धव ठाकरेंनी मातोश्रीतून निघून ममता बॅनर्जी यांच्या घरात बसून आंदोलन केले पाहिजे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed