ममता बॅनर्जींचे 'थर्ड डिग्री' राजकारण संपले:आता बंगालमध्ये सुशासन येणार, महाराष्ट्रातील विरोधकांनीसुद्धा धडा घ्यावा- चंद्रशेखर बावनकुळे

0
copy-of-db-temp-photo-resize-marathi-93_1777962024.jpg




बंगालमध्ये अनेक दिवसांचा संघर्ष आहे. ममता बॅनर्जी यांच्याकडून आमच्या हजारो कार्यकर्त्यांच्या हत्या करण्यात आल्या. संघ परिवार, भाजप आणि बुथ मॅनजमेंट आणि ज्येष्ठ नेत्यांसह कार्यकर्त्यांनी पश्चिम बंगालमध्ये मेहनत घेतली. बंगालमध्ये दृष्ट शासन जात तिथे सुशासन आले पाहिजे अशी सर्वांची इच्छा होती, असे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, नसरापूर प्रकरणातील पीडितेच्या परिवारासोबत संपूर्ण महाराष्ट्र उभा आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वचन दिले आहे की आरोपीला यमसदनी पाठवण्यासाठी ज्या गोष्टी गरजेच्या आहे त्या पोलिस आणि सरकार करणार आहे. राज्यातील विरोधकांनी धडा घ्यावा चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, पश्चिम बंगालमधील विजय हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारताच्या संकल्पाना मजबूत करणारा विजय आहे. तेथील जनतेने विकासाला मतदान केले आहे. ममता बॅनर्जी यांचे थर्ड डिग्री राजकारणाला संपवण्याचे काम बंगालच्या जनतेने केले आहे. यातून महाराष्ट्रातील विरोधी पक्षाने धडा शिकला पाहिजे. देशाने मोदीजींना साथ दिली चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, देश विकासाच्या बाजूने चालला आहे. जनता विकासाच्या बाजूने चालली आहे. तरीही विरोधक सुधरत नाही. ना काँग्रेस ना उबाठा सुधारत नाही. महाराष्ट्रातील विरोधी पक्षातील नेते 2047 पर्यंत घरी बसतील. कारण महाराष्ट्र विकासाच्या बाजूने उभा आहे. देशाने मोदीजींना साथ दिली आहे ती कायम राहील असे आम्हाला वाटते. भाजप जिंकली की लोकशाही धोक्यात? नवनाथ बन यांनी राऊतांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत म्हटले की, काँग्रेस किंवा विरोधक जिंकले की लोकशाहीचा विजय म्हणायचा, आणि भाजप जिंकली की लोकशाही धोक्यात आली असे म्हणायचे—हा दुटप्पीपणा आहे. त्यांनी स्पष्ट केले की, जनतेचा कौल मान्य करण्याची तयारी विरोधकांकडे नाही आणि म्हणूनच पराभवानंतर अशा प्रतिक्रिया दिल्या जातात. पश्चिम बंगालमध्ये झालेल्या निकालावर बोलताना बन म्हणाले की, निवडणूक आयोग नव्हे, तर जनतेने ममता सरकारच्या 15 वर्षांच्या कारभाराचा हिशोब केला. त्यांनी हिंसाचार, अत्याचार आणि गुंडगिरीचा उल्लेख करत, जनतेनेच या पापांचा अंत केला असल्याचे सांगितले. तसेच महाराष्ट्रातही जनतेने महायुतीला पाठिंबा देऊन उद्धव ठाकरे यांच्या कारभाराला नकार दिला, असे त्यांनी नमूद केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed