नसरापूर प्रकरणातील आरोपीच्या कुटुंबीयांचा संताप:म्हणाले – फक्त फाशी नाही, त्याला दगडाने ठेचा, जिवंत जाळा; तोंडही न पाहण्याची इच्छा

0
copy-of-db-temp-photo-resize-marathi-2026-05-05t11_1777960647.png




नसरापूर बलात्कार प्रकरणातील आरोपीच्या कुटुंबीयांनी आरोपीच्या कृत्यावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. आरोपीच्या पत्नीने आरोपीला केवळ फाशीच नव्हे तर दगडाने ठेचून जिवंत जाळण्याची मागणी केली आहे. तर मुलाने त्या नराधमाला आपला बाप म्हणवून घेण्याची लाज वाटत असल्याची संतप्त भावना व्यक्त केली आहे. वर्षभरापूर्वी अंबरनाथमध्ये एका 4 वर्षीय चिमुकलीवर बलात्कार केल्याची घटना घडली होती. त्याचे राज्यभर तीव्र पडसाद उमटले होते. या घटनेची शाई वाळते न वाळते तोच आता पुण्याच्या भोर तालुक्यातील नसरापूर येथील एका 4 वर्षीय चिमुकलीवर एका 65 वर्षीय नराधमाने बलात्कार करून तिची दगडाने ठेचून हत्या केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या घटनेमुळेही महाराष्ट्रात खळबळ माजली असून, आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी होत आहे. आरोपीच्या पत्नी व मुलानेही या प्रकरणी तीव्र संताप व्यक्त केला आहे. पत्नीची आरोपीला जिवंत जाळण्याची मागणी प्रस्तुत प्रकरणातील आरोपीच्या पत्नीने एका वृत्तवाहिनीशी बोलताना आरोपीला जिवंत जाळण्याची मागणी केली आहे. तसेच मागील 10 वर्षांपासून आपले त्याच्याशी कोणतेही संबंध नसल्याचाही दावा केला आहे. त्या बाळाची हत्या झाली त्याच ठिकाणी त्याला तसेच ठेचून मारले पाहिजे. मला त्याचे तोंडही पाहायचे नाही. मला कुणी त्याचा अंत्यविधी झाल्याचेही सांगू नये. मागील 10 वर्षांपासून तो आमच्या संपर्कात नाही. त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे. फक्त फाशी नाही, त्याला ठेचला पाहिजे. जिवंत जाळला पाहिजे. त्यानंतनरही माझ्या मनाची झालेली आग शांत होणार नाही. त्याचे नाव आमच्या नावाला जोडले गेले आहे. त्यामुळे आम्हाला लोकांचे बोल ऐकूण घ्यावे लागत आहेत, असे आरोपीच्या पत्नीने म्हटले आहे. आम्हाला खूप मानसिक त्रास होतोय – मुलगा दुसरीकडे, आरोपीच्या मुलाने आरोपीला आपले वडील म्हणवून घ्यायलाही लाज वाटत असल्याचा संताप व्यक्त केला आहे. मला तो माझा बाप म्हणवून घेण्याचीही लाज वाटत आहे. त्या चिमुकलीशी त्याने अमानुष कृत्य केले. त्याला कठोरात कठोर शिक्षा द्यायला हवी. विशेषतः त्याला त्याच ठिकाणी ठेचून मारून त्या चिमुकलीला न्याय दिला पाहिजे. मला 11 भाचा-भाची आहेत. ती चिमुकलीही मला माझ्या भाचीसारखीच होती. या घटनेनंतर मला खूप वाईट वाटत आहे. त्याला मारले पाहिजे. आम्हाला सध्या खूप मानसिक त्रोस होत आहे. आपण शिवछत्रपतींच्या महाराष्ट्रात राहतो. न्यायव्यवस्थेवरील लोकांचा विश्वास वाढेल असे काहीतरी आपण केले पाहिजे, असे आरोपीचा मुलगा म्हणाला. आरोपीचा अशाच गुन्ह्यांचा इतिहास नसरापुरात गत 1 मे रोजी एका 65 वर्षीय आरोपीने गावातीलच 4 वर्षीय चिमुकलीचा पाठलाग करून तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर दगडाने ठेचून तिची निर्घृण हत्या केली. कुणाला संशय येऊ नये म्हणून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्या मुलीचा मृतदेह त्याने शेणाच्या ढिगाऱ्याखाली पुरला. मुलीच्या कुटुंबीयांनी गावकऱ्यांच्या मदतीने तिचा शोधाशोध सुरू केली तेव्हा तिचा मृतदेह सापडला. त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर आरोपीच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांच्या मते, आरोपीचा असे पाशवी गुन्हे केल्याचा इतिहास आहे. यापूर्वी याच कारणासाठी गावकऱ्यांनी त्याची धिंड काढून त्याला गावाबाहेर हाकलून दिले होते. त्याला स्वतःला 7 मुली आहेत. 2015 साली आरोपीने एका छोट्या मुलीवर बलात्कार केला होता. तेव्हा त्याच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल होऊन शिक्षाही झाली होती. पण त्याच्या पत्नीने त्याची जामिनावर सुटका केली होती. एका वृद्ध महिलाही त्याच्या वासनेला बळी पडल्याचे सांगितले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed