प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी पूर्वसूचना न देता बैठक घेतली:माहितीअभावी शेतकऱ्यांचा संताप, शेतकऱ्यांचा आरोप, फुलंब्री तहसील कार्यालयात खरीप आढावा बैठक गाजली
![]()
फुलंब्री येथील प्रशासकीय इमारतीत सोमवारी दुपारी २ वाजता खरीप हंगाम आढावा बैठक झाली. खासदार डॉ. कल्याण काळे, आमदार अनुराधा चव्हाण यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. बैठकीचे नियोजन विस्कळीत झाल्याचे चित्र दिसले. तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांना बैठकीची साधी
.
खरीप हंगामासाठी बियाणे उपलब्धता, रासायनिक खतांचा पुरवठा, पीक कर्ज वितरण, मागील वर्षाचा पीकविमा या मुद्द्यांवर बैठक ठेवली होती. प्रत्यक्ष प्रश्न विचारले गेले. संबंधित अधिकारी माहिती देऊ शकले नाहीत. तालुक्यात ५७ हजार खातेदार शेतकरी आहेत. मागील वर्षी केवळ १८ हजार ७ शेतकऱ्यांना कर्ज मिळाले. उर्वरित शेतकऱ्यांचे काय, हा प्रश्न उपस्थित झाला. प्रशासनाकडे ठोस उत्तर नव्हते. मागील वर्षी अनेक शेतकऱ्यांना पीकविमा मिळाला नाही, अशी व्यथा मांडली गेली.
अधिकाऱ्यांच्या टोलवाटोलवीमुळे शेतकऱ्यांचा संताप वाढला. तालुका कृषी अधिकारी पंकज वाळके यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली. प्रश्नांची उत्तरे देताना त्यांची, उपस्थित अधिकाऱ्यांची दमछाक झाली. सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत बैठकीची माहिती का पोहोचली नाही, हा मुद्दा चर्चेत आला.
शेतकऱ्यांच्या हितासाठी बैठक होती की केवळ सोपस्कारासाठी, असा सवाल शेतकऱ्यांनी केला. प्रशासनाने माहिती लपवून बैठक कोणासाठी घेतली, असा प्रश्नही उपस्थित झाला. बैठकीला जिल्हा परिषद उपाध्यक्ष जितेंद्र जैस्वाल, पंचायत समिती सभापती सर्जेराव मेटे, उपसभापती अश्विनी सोनवणे, जि.प. सदस्य गोपाल वाघ उपस्थित होते.
