माथाडी हमालाच्या मुलाची जिद्द; स्पर्धा परीक्षेतून झाला पोलिस उपनिरीक्षक:भानसहिवरे गावात दादासाहेब भाऊसाहेब टाके यांच्या यशाचे कौतुक‎

0
app_177786256169f807a14be9d_945643.jpg



नेवासे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये माथाडी हमालीचे काम करणाऱ्या वडिलांच्या कष्टाचे चीज करत, भानसहिवरे येथील सुपुत्राने खाकी वर्दीचे स्वप्न साकारले आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत दादासाहेब भाऊसाहेब टाके यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पर

.

दादासाहेब यांचे वडील दिवंगत भाऊसाहेब टाके हे बाजार समितीत हमाल व तोलाईचे काम करायचे. त्यांच्या पश्चात आई लक्ष्मीबाई यांनी मुलाच्या शिक्षणासाठी मोठे कष्ट उपसले. घरची आर्थिक ओढाताण आणि हलाखीची परिस्थिती असतानाही दादासाहेब यांनी जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर एमपीएससीचा गड सर केला. त्यांच्या या यशामुळे टाके कुटुंबाच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले असून, भानसहिवरा गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

या यशानिमित्त गावात सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. माजी सरपंच देविदास साळुंके यांच्या हस्ते दादासाहेब यांचा सन्मान करण्यात आला. साळुंके म्हणाले, “जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर ग्रामीण भागातील तरुण कोणतेही ध्येय गाठू शकतो, हे दादासाहेबने सिद्ध केले आहे.यावेळी माजी सरपंच अशोक बोरा,माथाडी कामगार संघटनेचे नेते बाबा आरगडे,मार्केट कमेटीचे संचालक हरिभाऊ शिंदे,अशोक कदम,सोमनाथ शेंडे, प्रीतम साळुंके यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed