अभ्यासाची जिद्द ठेवा व पालकांचे ऋण फेडा- मुख्य अभियंता चव्हाण:मतेवाडी फाटा पिंपळगाव येथील विद्यालयात विद्यार्थी-पालक सन्मान सोहळा‎

0
240_177790498769f8ad5bb42e6_chavansahebhd.jpg




सध्याचे युग विज्ञानाचे आहे. स्पर्धेत टिकण्यासाठी अभ्यासाशिवाय पर्याय नाही. आई-वडील तुम्हाला शिकवण्यासाठी अतोनात कष्ट करतात. ही जाणीव प्रत्येक विद्यार्थ्याने ठेवावी. पालकांच्या कष्टाचे ऋण फेडायचे असेल तर जिद्दीने अभ्यास करा. मोठ्या पदावर नोकरी मिळवा, असे आवाहन सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांनी केले. मतेवाडी फाटा, पिंपळगाव येथील आदर्श प्राथमिक व ग्रामगीता विद्यालयात शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा, त्यांच्या पालकांचा सन्मान सोहळा झाला. उद्घाटनप्रसंगी चव्हाण बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अतुल चव्हाण होते. प्रमुख पाहुणे म्हणून शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष काशीनाथ जाधव उपस्थित होते. तेजराव चव्हाण, देवनाथ सोनवणे, बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा लताबाई जाधव, बाजार समिती संचालक योगेश जाधव, अश्विनी जाधव, वर्षा गावंडे उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार झाला. त्यांच्या प्रगतीत मोलाचा वाटा उचलणाऱ्या पालकांचाही विशेष गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना चव्हाण म्हणाले, आई-वडील शिक्षणाचे साहित्य कसे उपलब्ध करून देतात याचा विचार विद्यार्थ्यांनी करावा. त्यासाठी किती परिश्रम घेतात याची जाणीव ठेवावी. ही जाणीव ज्यांना असते तेच विद्यार्थी भविष्यात यशस्वी होतात, असेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमासाठी मुख्याध्यापिका अश्विनी जाधव, सचिन निर्मळ, अनिल गायकवाड, शाळेतील शिक्षक, कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन परसराम घुगे यांनी केले. आभार मुख्याध्यापक योगेश जाधव यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed