अकोट वन्यजीव विभागात 23 वाघ, 8 बिबट्यांचे दर्शन:बुद्ध पौर्णिमेच्या लख्ख प्रकाशात 58 वन्यप्रेमींनी मचाणीवर बसून घेतला आनंद
![]()
८१ हजार १९२ हेक्टरवर पसरलेल्या आणि वनश्रीमंत असलेल्या अकोट वन्यजीव विभागातील पाच परिक्षेत्रात बुद्ध पौर्णिमेच्या लख्ख प्रकाशात झालेल्या प्राणी गणनेत धारगड परिक्षेत्रात सर्वाधिक वाघ, तर सोनाळा परिक्षेत्रात बिबट्यांचे निसर्गप्रेमींना दर्शन झाले असल्याची माहिती मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे उपवनसंरक्षकांनी सोमवारी दिली. बुद्ध पौर्णिमेला शुभ्र प्रकाशात “निसर्ग अनुभव’ कार्यक्रम पार पडला होता. यामध्ये राज्यासह परराज्यातून ५८ पर्यटकांनी सहभाग नोंदवला. अकोट वन्यजीव विभागाकडून बौद्ध पौर्णिमानिमित्त राबवण्यात आलेल्या निसर्ग अनुभव उपक्रमांतर्गत अकोट वन्यजीव विभागातील पाच वन परीक्षेत्रात ५८ वन्यप्रेमींनी सहभाग नोंदवला. यावेळी महिलांची संख्याही राहिली. पाचही वनपरीक्षेत्रात बौद्ध पौर्णिमेच्या दिवशी २३ वाघ ८ बिबटे आढळून आल्याची नोंद आहे. पाचही वनक्षेत्रात बौद्ध पौर्णिमेच्या लखलखत्या प्रकाशात निसर्ग सौंदर्यासोबतच विविध प्राणी पाहण्याची संधी राज्यासह परराज्यातील वन्यप्रेमीना मिळाली होती. गत वर्षीच्या तुलनेत यंदा वाघाची संख्या अधिक वाढल्याने येत्या काही काळात अकोट वन्यजीव विभागात जंगल सफारीसाठी येणाऱ्या पर्यटकांमध्ये निश्चितच वाढ होणार असल्याचे बोलले जाते. अकोट वन्यजीव विभागात ५८ निसर्गप्रेमींनी (सोबत ११४ वनमजूर) मचाणीवर बसून वन्यप्राण्यांच्या हालचाली आणि दर्शनाचा रोमांच अनुभवला. या उपक्रमात सहभागी झालेल्या निसर्गप्रेमींना जेवण, नाश्ता, पिण्याच्या पाण्याची सोय, मचाणीवर सोडणे आणि आणण्याची व्यवस्था करण्यात आली होती. मचाणीवर बसण्यापूर्वी संबंधित वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी आवश्यक सूचना आणि मार्गदर्शन केले होते. त्यानंतर निसर्गप्रेमींनी पाणवठ्यावर येणाऱ्या वन्यजीवांचे निरीक्षण केले. {मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील अकोट वन्यजीव विभागांतर्गत झालेल्या निसर्ग अनुभव कार्यक्रमात आढळून आलेल्या प्राण्यांची संख्या वन विभागाकडून देण्यात आली. {धारगड परिक्षेत्रात सर्वाधिक १३ वाघ २ बिबटे, सोनाळा परिक्षेत्रात ९ वाघ ३ बिबटे, वानपरिक्षेत्रात १ वाघ, १ बिबटे, तर नरनाळा, सोमठाणा परीक्षेत्रात प्रत्येकी १ वाघ अशा पाच परिक्षेत्रात २३ वाघ, ८ बिबट्यांचे वन्यप्रेमींना पाणवठ्यावर दर्शन झाले आहे. {या शिवाय ४४ अस्वल, ९७ नीलगाय, ३६८ सांबर, ४२ भेंडकी, १५७ गवा, ९८ रानडुक्कर, १ लंगुर, ३३५ माकड, ६ मसण्या उद, ८५ रान कोंबडी, १२ रान मांजर, २८० मोर, २४ ससे,४ सायळ, १० रानकुत्रा, २ कोल्हे, २ चांदी अस्वल, ४३५ चितळांचे दर्शन झाल्याची माहिती विभागाकडून देण्यात आली. गणनेत आढळले ४४ अस्वलं, ९७ नीलगायी, ३६८ सांबर, १५७ गवा
