पैठण तालुक्यात यंदा ७९,१६० हेक्टर‎क्षेत्रावर खरिपाची पेरणी होण्याचा अंदाज‎:तालुक्यात कापूस, सोयाबीन, बाजरी, तूर, मूग, उडीद, ज्वारी प्रमुख पिके‎

0
730-x-548-new-2026-05-04t073115268_1777860129.jpg




प्रतिनिधी | पैठण खरीपाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात कृषी यंत्रणा सज्ज असून बियाण्यांच्या मागणी-पुरवठ्याचे चित्र स्पष्ट होत आहे. यंदा सुमारे ७९,१६० हेक्टर क्षेत्रावर पेरणी होण्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला. त्यानुसार विविध पिकांसाठी बियाण्यांचे नियोजन अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. यात यंदा पावसाचे प्रमाण कमी असणार असल्याने खरिपाच्या क्षेत्रात घट होईल, असा अंदाज असल्याचे कृषि अधिकारी विकास पाटील यांनी सांगितले. तालुक्यात कापूस, सोयाबीन, बाजरी, मका, तूर, मूग, उडीद, ज्वारी, भुईमूग व तीळ ही प्रमुख खरीप पिके असून त्यासाठी लागणाऱ्या बियाण्यांची गरज निश्चित करण्यात आली आहे. कापूस पिकासाठी सुमारे १८७० क्विंटल बियाण्यांची आवश्यकता असून त्याची १०० टक्के उपलब्धता दर्शवण्यात आली आहे. मात्र, सोयाबीन व बाजरी या प्रमुख पिकांमध्ये अद्याप तुटवडा जाणवत आहे. सोयाबीनसाठी १३३८ क्विंटल बियाण्यांची गरज असून सध्या केवळ ५० टक्के उपलब्धता आहे. बाजरीसाठी १६६५.५० क्विंटल मागणी असून सुमारे ३५ टक्केच उपलब्धता असल्याचे चित्र आहे. इतर पिकांमध्ये मका (२९७ क्विंटल), तूर (८९ क्विंटल), मूग (१२२ क्विंटल), उडीद (१०० क्विंटल), ज्वारी (६ क्विंटल), भुईमूग (५५६९ क्विंटल) आणि तीळ (३१०५ क्विंटल) बियाण्यांचे नियोजन करण्यात आले आहे. या पिकांसाठी पुरवठा टप्प्याटप्प्याने वाढविण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. ट्रॅक्टरच्या साहाय्याने नांगरणी, वखरणी दरम्यान, खरीपपूर्व तयारीला शेतकऱ्यांनी वेग दिला असून आधुनिक यंत्रसामग्रीचा वापर वाढला आहे. ट्रॅक्टरच्या साहाय्याने नांगरणी, वखरणी आणि मशागत कामे मोठ्या प्रमाणात केली जात आहेत. मात्र, यंत्रसामग्रीच्या वापरासाठी लागणारा खर्च वाढल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक ताण वाढत असल्याचे चित्र आहे. विशेषतः ट्रॅक्टरच्या भाड्याचे दर प्रतिएकर वाढल्याने लहान व मध्यम शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. तरीही वेळेत मशागत पूर्ण करण्यासाठी शेतकरी यांत्रिकीकरणाचा पर्याय स्वीकारत असल्याचे दिसून येते. १२ कृषी मंडळांमध्ये मार्गदर्शन सुरू यंदा पावसाच्या अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात खरीप लागवडीचे क्षेत्र काही प्रमाणात घटण्याची शक्यता व्यक्त होत असून त्यानुसार कृषी विभागाने नियोजनाला सुरुवात केली आहे. हवामान विभागाच्या सूचनांनुसार शेतकऱ्यांनी पेरणीचे नियोजन करावे. यासाठी तालुक्यातील १२ कृषी मंडळांमध्ये मार्गदर्शन सुरू आहे. पावसाचा अंदाज लक्षात घेऊन पेरणीची योग्य वेळ निश्चित करण्यावर भर दिला जात असल्याचे तालुका कृषी अधिकारी विकास पाटील यांनी सांगितले. पैठण तालुक्यातील ढोरकीन परिसरात खरिप पुर्व मशागतीला वेग आला आहे. छाया ः दत्तात्रय मुळे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed