कर्तृत्व, संस्कृती, शौर्याचा जल्लोष; महाराष्ट्र दिन दिमाखामध्ये साजरा:जिल्हाभरात विविध कार्यक्रमांची रेलचेल‎

0
240_177770837169f5ad538ed3e_unnamed2026.jpg




प्रतिनिधी | अकोला शुक्रवार, १ मे रोजी महाराष्ट्र दिन राज्यभर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विविध शासकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या स्थापनेचा गौरव करण्यात आला. शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालये तसेच विविध संस्थांमध्ये ध्वजारोहण, सांस्कृतिक कार्यक्रम आणि समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्र दिनावर रेडक्रॉस येथे स्वच्छता दूतांचा सन्मान -फोटो अकोला | रेडक्रॉस सोसायटीने आरोग्य विषयक उपक्रमाला सतत प्रोत्साहन देत महाराष्ट्र दिन, कामगार दिन तथा ज्यांच्या अस्थी राष्ट्रात प्रथम गांधीग्राम येथे विसर्जित करण्यात आल्या आहेत. अशा ज्येष्ठ सर्वोदयी नेत्या, माजी राज्यसभा सदस्य स्व. निर्मला देशपांडे यांचा स्मृती दिन साजरा करून आपले सामाजिक दायित्व जोपासले असल्याचे भावोद्गार रेडक्रॉसचे चेअरमन डॉ. किशोर मालोकार यांनी व्यक्त केले. सामाजिक व मानवीय सेवा कार्यात सक्रिय असणाऱ्या रेडक्रॉस सोसायटीच्या वतीने महाराष्ट्र दिन, कामगार दिन, जेष्ठ सर्वोदयी नेत्या, पद्मविभूषण, माजी खा. स्व. निर्मलाताई देशपांडे यांचा स्मृतिदिन साजरा करण्यात आला. यात स्वच्छता दूतांचा सन्मान करून त्यांच्यासाठी वैद्यकीय उपक्रम राबवण्यात आला. स्थानीय सुभाष चौक येथील रेडक्रॉस सोसायटी येथे आयोजित मोफत वैद्यकीय उपक्रम कार्यक्रमाचे उद्घाटन दंतरोग तज्ञ डॉ. सिमरनजित सिह बछेर यांनी केले. तर होमिओपॅथी दालनाचे उद्घाटन होमिओपॅथी तज्ञ डॉ. संदीप चव्हाण यांच्या हस्ते व रेडक्रॉसचे उपाध्यक्ष अॅड. महेंद्र साहू, अॅड. सुभाषसिह ठाकूर, अॅड. सुभाष मुंगी, प्रशांत राठी, अॅड. अमर गौड, रामहरी डांगे आदींच्या उपस्थितीत करण्यात आले. उन्हापासून संरक्षण होण्यासाठी सनकूल होमिओपॅथी औषधांचा वितरण या वेळी करण्यात आले. कार्यक्रमात रेडक्रॉसचे सचिव प्रभजित सिंह बछेर यांनी आपले विचार व्यक्त करीत महाराष्ट्र दिन, कामगार दिनाचे महत्त्व व सर्वोदयी नेत्या स्व. निर्मलाताई देशपांडे यांच्या सेवा कार्याची जाणीव करून देत उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या सफलतेसाठी अनमोल सिंह बछेर, केदार काजळे, मंगला डोंगरे आदींनी परिश्रम घेतले. या वेळी बहुसंख्य स्वछता दूत, नागरिक व रेडक्रॉसचे पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed