Class 12th result 90.14 percent; 5.86% increase; Girls win
गतवर्षीच्या तुलनेने यंदा बारावीचा निकाल ५.८६ टक्क्यांनी वाढला आहे. गतवर्षी परीक्षा कॉपीमुक्त व्हावी, यासाठी राज्य शिक्षण मंडळातर्फे नवा पॅटर्न राबवण्यात आला. प्रसंगी फौजदारी कार्यवाहीची तरतूद होती. त्यामुळे यंदा प्रामुख्याने यशस्वी होण्यासाठी अभ्यासा
.
प्रतिनिधी | अकोला राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावी (इयत्ता १२ वी) परीक्षेचा निकाल शनिवार, २ मे रोजी अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला. यामध्ये अकोला जिल्ह्याने ९०.१४ टक्के निकाल नोंदवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. गतवर्षीच्या ८४.२८ टक्क्यांच्या तुलनेत यंदा निकालात ५.८६ टक्क्यांची लक्षणीय वाढ झाली आहे. जिल्ह्यात मुलींचा निकाल मुलांपेक्षा सरस ठरला आहे. मुलींचा उत्तीर्ण होण्याचा टक्का ९३.९१, तर मुलांचा ८६.७० टक्के निकाल लागला आहे. त्यामुळे यंदाही निकालात मुलींनीच बाजी मारल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे. ७.२१ टक्क्यांनी मुलींचा निकाल अधिक आहे. शाखानिहाय निकालात विज्ञान शाखेने ९६.९५ टक्के निकालासह आघाडी घेतली आहे. त्याखालोखाल वाणिज्य शाखेचा निकाल ९१.५१ टक्के लागला. कला शाखेचा निकाल ७८.४५ टक्के आहे. व्होकेशनल शाखेचा निकाल ६४.४९ टक्के इतका आहे.अमरावती विभागातील जिल्हानिहाय निकालात अकोला जिल्हा ९०.१४ टक्क्यांसह तिसरा आहे. विभागात बुलडाणा जिल्हा ९५.२२ टक्क्यांसह प्रथम, तर वाशीम जिल्हा ९१.१५ टक्क्यांसह द्वितीय स्थानावर आहे. यवतमाळ (८९.६९) आणि अमरावती (८८.२६) जिल्हे अनुक्रमे चौथ्या व पाचव्या स्थानावर आहेत. माधव मुन्शी, प्राचार्य, न्यू इंग्लिश कनिष्ठ महाविद्यालय, अकोला.
अकोला ९०.१४ अमरावती ८८.२६ बुलडाणा ९५.२२ यवतमाळ ८९.६९ वाशीम ९१.१५
अकोला ९१.३१ अकोट ८९.२५ तेल्हारा ९३.३५ बार्शीटाकळी ८८.७७ मूर्तिजापूर ८४.८३ बाळापूर ८३.३६

