स्व. ज्योती जानोळकर कनिष्ठ महाविद्यालयाचा ९८ टक्के निकाल:विद्यार्थ्यांवर दिले वैयक्तिक लक्ष, उज्ज्वल यशाची परंपरा कायम
![]()
प्रतिनिधी | अकोला येथील स्व. ज्योती जानोळकर कनिष्ठ महाविद्यालयाने इयत्ता १२वी (एच.एस.सी.) परीक्षेत यंदाही ९८ टक्के निकाल लावत यशाची उज्ज्वल परंपरा कायम राखली आहे. महाविद्यालयातील शिक्षकांनी विद्यार्थ्यांवर वैयक्तिक लक्ष केंद्रित करून वर्षभर घेतलेल्या परिश्रमाचे हे फलित मानले जात आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी संस्थेचे व्यवस्थापन व शिक्षकवर्ग नेहमी तत्पर असतात. याचमुळे महाविद्यालयातील विद्यार्थी शैक्षणिक तसेच इतर विविध क्षेत्रांतही जिल्हास्तर, विभागीय व राज्यस्तरावर उल्लेखनीय यश संपादन करत महाविद्यालयाचे नाव उंचावत आहेत.यंदाच्या निकालात श्रेयश निलेश पाटील याने ८७ टक्के गुणांसह प्रथम क्रमांक मिळविला. शिवम किशोर संभापूरे (८५%) द्वितीय, तर कु. अनुष्का सुनिल जयस्वाल (८१%) हिने तृतीय क्रमांक पटकावला. गेल्या तीस वर्षांपासून उत्तम निकालाची परंपरा कायम राखणाऱ्या या महाविद्यालयात सर्वसामान्य विद्यार्थ्यांनाही उत्कृष्ट निकाल मिळवून देण्यावर विशेष भर दिला जातो. यासाठी प्रथम सत्र परीक्षा, घटक चाचण्या, तसेच सराव परीक्षा नियमित घेऊन विद्यार्थ्यांचा कसून सराव करून घेतला जातो. तसेच विद्यार्थ्यांशी संस्थेचे व शिक्षकांचे प्रेमाचे व आपुलकीचे नाते असल्याने त्यांना वैयक्तिक मार्गदर्शन व त्यांच्या समस्या सोडवण्यावरही विशेष लक्ष दिले जाते. यशस्वी विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय संस्था व्यवस्थापिका प्रतिभा जानोळकर, संस्था सचिव प्रा. प्रशांत जानोळकर, संस्था संचालिका स्मिता जानोळकर, प्राचार्य डी. यू. लांडे व शिक्षकवृंद तसेच आपल्या आई-वडिलांना दिले आहे.
