स्व. सोमेश्वर पुसतकरांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आझाद हिंद मंडळातर्फे रक्तदान शिबिर:शिबिरात रक्तदात्यांनी सहभाग नोंदवत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला
![]()
प्रतिनिधी । अमरावती स्थानिक आझाद हिंद मंडळ, अमरावतीच्या वतीने मंडळाचे दिवंगत सदस्य, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख, सामाजिक कार्यकर्ते स्वर्गीय सोमेश्वर पुसतकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ १ मे रोजी महाराष्ट्र दिनाच्या औचित्याने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या वेळी दात्यांनी रक्तदान केले. रक्तदान शिबिराचे उद्घाटन स्व. सोमेश्वर पुसतकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून मंडळाचे कार्याध्यक्ष व मनपातील विरोधी पक्षनेते विलास इंगोले व मंडळाचे सहसचिव ज्ञानेश्वर हिवसे यांच्या हस्ते झाले. त्यानंतर रक्तदान कार्यक्रमास सुरुवात झाली. याचवेळी स्वीकृत नगरसेवकपदी निवड झाल्याबद्दल ज्येष्ठ पत्रकार अनिल अग्रवाल, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल सुनिल खराटे व संतोष बद्रे यांचा मंडळातर्फे सत्कार केला.बॅडमिंटन खेळाडू माधुरी खडसे हिचाही सत्कार केला.रक्तदान शिबिराला माजी खासदार अनंतराव गुढे, स्थायी समितीचे माजी सभापती विवेक कलोती, राजू महल्ले, अभय ढोबळे, सुभाष पावडे, अविनाश दुधे, दिलीप कलोती, ॲड. आशिष लांडे, नंदू गुबले, नितीन सराफ, प्रवीण पाटील, संजय मुचळंबे, भूषण पुसतकर, पंकज लुंगीकर, निलेश कारंजकर, रेवन पुसतकर, निलेश सराफ, संतोष चिखलकर, मयूर जलतारे, राजगुरू हिंगमिरे, वेदांत डांगे, बबलू खडेकार, अविनाश भडांगे, मनोज केवले, वैभव दलाल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या वेळी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयाच्या रक्तपेढीच्या चमूने रक्त संकलनाचे कार्य केले. या शिबिरात रक्तदात्यांनी सहभाग नोंदवत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
