"अहिल्यानगर महिला प्रीमियर‎ लीग''चे शिवराज वॉरियर्सचे विजेते‎:क्रीडा केडगावमध्ये ७ एकरात उभारणार क्रिकेट स्टेडियम : आ. जगताप‎

0
253_177773198669f609921406e_38am.jpg




प्रतिनिधी | अहिल्यानगर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने व एस. के. क्रिकेट अकॅडमीच्या वतीने आयोजित ‘अहिल्यानगर महिला प्रीमियर लीग’चा थरार शिवराज वॉरियर्सच्या विजयाने संपुष्टात आला. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या अंतिम सामन्यात शिवराज वॉरियर्सने जी एन एस नाईट रायडर्सचा पराभव करत जेतेपदावर शिक्कामोर्तब केले. अंतिम लढतीत जी एन एस नाईट रायडर्सने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ८ बाद ११६ धावा केल्या होत्या. ११७ धावांचे माफक आव्हान शिवराज वॉरियर्सने केवळ १६ षटकांत २ गडी गमावून पूर्ण केले. उत्कृष्ट फलंदाजी आणि अचूक गोलंदाजीच्या जोरावर शिवराज वॉरियर्सने प्रेक्षकांची मने जिंकली. आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते विजेत्या संघांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. आमदार संग्राम जगताप यांनी खेळाडूंना प्रोत्साहन देताना मोठी घोषणा केली. “अहिल्यानगरमध्ये स्वतंत्र क्रिकेट स्टेडियमची गरज ओळखून केडगाव भागात ७ एकर जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. लवकरच येथे आधुनिक सुविधांनी सज्ज स्टेडियम उभे राहील,” असे त्यांनी सांगितले. तसेच मुलींनी खेळात सातत्य ठेवून राष्ट्रीय स्तरावर झेंडा फडकवावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. या सोहळ्याला डॉ. हर्षवर्धन तन्वर, गणेश गोंडाळ, संदीप पाटोळे, सम्राट देशमुख, जितू गंभीर, अभिषेक वाकळे, केशव नागरगोजे, शिवराज आनंदकर, रावसाहेब बाबर उपस्थित होते. एस. के. अकॅडमीचे संदीप आडोळे यांनी आभार मानले. या खेळाडूंचा झाला गौरव स्पर्धेत आरती केदार, अंबिका वाराडे, संस्कृती गोरताले, मुक्ता मगरे, भूमी घोगरे आणि समयश देशमुख यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली. विशेष म्हणजे, बीसीसीआयच्या (BCCI) सराव शिबिरासाठी निवड झाल्याबद्दल शौर्य देशमुख याचा जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *