मोर्शीत महेशनवमीनिमित्त विविध कार्यक्रम:आरोग्य तपासणी, योग शिबिर आणि रक्तदान शिबिराचे आयोजन




मोर्शी तालुका माहेश्वरी मंडळाने महेशनवमीनिमित्त विविध लोकोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमांमध्ये आरोग्य तपासणी शिबिर, योग शिबिर आणि रक्तदान शिबिराचा समावेश आहे. कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी, शनिवारी डॉ. भरत राठी यांच्या दवाखान्यात बीपी आणि शुगर तपासणी शिबिर घेण्यात आले. याच दिवशी रात्री नऊ वाजता जपाली हनुमान मंदिरात १०८ वेळा ओंकाराचा जप आणि सामूहिक हनुमान चालीसा पठणाचा कार्यक्रम झाला, ज्यात माहेश्वरी बांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. दुसऱ्या दिवशी, आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त गुरुदेव सेवा मंडळ सभागृह, हनुमान नगर येथे योग प्रशिक्षक डॉ. शितल यश मंत्री यांनी योग आणि प्राणायामाचे महत्त्व तसेच त्याचे आरोग्यविषयक फायदे यावर मार्गदर्शन केले. निरोगी जीवन, शांत मन आणि सकारात्मक जीवनशैलीसाठी योगाभ्यास आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. सोमवार, २२ रोजी महेशनवमीच्या मुख्य पर्वावर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमांना यशस्वी करण्यासाठी मोर्शी तालुका माहेश्वरी मंडळाचे नंदकिशोर गांधी, नंदकिशोर मंत्री, विजय तापडिया, शरद भैय्या, चेतन मंत्री, मनीष बंग, डॉ. श्याम राठी, उमेश मंत्री, राजू राठी, सागर राठी, सुधीर झंवर, डॉ. सुमित राठी, सुनील राठी, श्रीकिसन राठी, संजय भैय्या, प्रेम मंत्री, विनय साबू, निलेश राठी, गोपाल मंत्री, उमेश गांधी, रमेशचंद्र बंग, प्रा. जयकुमार गट्टानी, प्रमोद राठी, विपुल राठी, अजय साबू यांच्यासह माहेश्वरी समाजाचे अनेक युवक परिश्रम घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *