प्रतिभा चाकणकरांना ED चे समन्स:भोंदू अशोक खरात प्रकरणात होणार कसून चौकशी; प्रतिभा ह्या रुपाली चाकणकरांच्या भगिनी

0
copy-of-db-temp-photo-resize-marathi-2026-05-02t08_1777692153.png




भोंदू अशोक खरात प्रकरणाचा तपास करणाऱ्या अंमलबजावणी संचालयाने (ईडी) आता चौकशीसाठी राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या भगिनी प्रतिभा चाकणकर यांना चौकशीसाठी बोलावले आहे. समता पतसंस्थेशी संबंधित कथित आर्थिक अनियमिततेच्या प्रकरणात ईडीने त्यांना हा समन्स बजावल्याची माहिती आहे. नाशिकच्या भोंदू अशोक खरातवर राज्यातील अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. याविषयी त्याच्यावर 10 हून अधिक गुन्हे दाखल झालेत. याशिवाय आर्थिक गैरव्यवहाराचेही काही गुन्हे खरातवर दाखल आहेत. त्याने अहिल्यानगरच्या राहाता तालुक्यातील समता पतसंस्थेतही बनावट खाती काढून गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. या पतसंस्थेत प्रतिभा चाकणकर यांची 4 खाती आहेत. या खात्यांमधील संशयास्पद आर्थिक व्यवहाराप्रकरणी ईडीने प्रतिभा यांना समन्स बजावल्याची माहिती आहे. मुंबईतील कार्यालयात बोलावले चौकशीला यासंबंधीच्या माहितीनुसार, भोंदू अशोक खरातने समता पतसंस्थेतील खात्यांच्या माध्यमातून पैशांची मोठी उलाढाल केली आहे. समता पतसंस्थेच्या राहाता येथील शाखेत प्रतिभा चाकणकर यांच्या नावे 4 खाती आहेत. या खात्यांच्या माध्यमातून तब्बल 2 कोटी 40 लाख रुपयांची मोठी उलाढाल झाली आहे. या सर्व खात्यांना अशोक खरात नॉमिनी आहे. त्यामुळे ईडीची नजर प्रतिभा चाकणकर व अशोक खरात यांच्यातील कथित आर्थिक संबंधांवर पडली आहे. त्यानुसार, ईडीने त्यांना समन्स बजावून मुंबईतील झोन -2 च्या कार्यालयात चौकशीसाठी बोलावले आहे. यापूर्वी शिर्डी पोलिसांनी केली चौकशी उल्लेखनीय बाब म्हणजे शिर्डी पोलिसांनी काही दिवसांपूर्वी या प्रकरणी प्रतिभा चाकणकरांची चौकशी केली होती. त्यावेळी प्रतिभा व त्यांचा मुलाची संयुक्तपणे 8 तास चौकशी केली होती. या चौकशीत त्यांच्या पैशांचा स्त्रोत काय आहे? व अशोक खरातशी त्यांच्या आर्थिक व्यवहारांचा नेमका काय संबंध आहे? हे शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यावेळी प्रतिभा यांनी आपल्यावरील सर्वच आरोप फेटाळले होते. पण आता या प्रकरणात थेट ईडीची एन्ट्री झाल्यामुळे त्यांच्या अडचणींत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. प्रतिभा चाकणकरांचे खरातला 218 मेसेज उल्लेखनीय बाब म्हणजे प्रतिभा यांनी आपला भोंदू अशोक खरातशी कोणताही संबंध नसल्याचा दावा केला आहे. पण सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी प्रतिभा चाकणकर व अशोक खरात यांच्यात 1 एप्रिल 2025 ते 17 मार्च 2026 या कालावधीत तब्बल 236 वेळा बोलणे झाल्याचा दावा केला आहे. यात खरातने चाकणकरांना केलेल्या 17 कॉल्सचाही समावेश आहे. विशेष म्हणजे प्रतिभा चाकणकरांनी 218 मेसेज खरातला केलेत. तन्मय चाकणकरांचे खरातला 37 कॉल प्रतिभा यांचा मुलगा तन्मय व अशोक खरात यांच्यात 37 कॉल्स झाल्याचे समोर आले आहे. यात 11 कॉल्स तन्मयने खरातला केले, तर 20 कॉल्स खरातने तन्मयला केले आहेत. यात 8 मेसेजेसचाही समावेश आहे. ‘अशोक खरातशी कोणताही संबंध नव्हता आणि खाती बनावट होती, तर वर्षभरात हे शेकडो मेसेजेस आणि कॉल्स नक्की कशासाठी झाले? असा सवाल दमानिया यांनी या प्रकरणी उपस्थित केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed