बच्चू कडू शिवसेनेत झाले गोड:32 वर्षांनंतर धनुष्यबाण हाती घेऊन विधान परिषदेची आमदारकी केली फिक्स
![]()
माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी गुरुवारी (दि. ३०) मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. तत्पुर्वी १९९४ मध्ये त्यांनी शिवसैनिक म्हणून राजकिय कारकीर्द सुरू केली होती. मात्र कालातंराने त्यांनी शिवसेना सोडली होती. दरम्यान आता पुन्हा ३२ वर्षांनतर बच्चू कडू शिवसेनेत परतले आहे. प्रवेश घेतल्यानंतर त्यांनी तत्काळ विधान परिषदेच्या सदस्य पदासाठी नामांकन अर्ज दाखल केला. ही निवडणूक अविरोध होणार असल्यामुळे बच्चू कडू यांची विधान परिषद सदस्य म्हणून निवड निश्चित मानली जात आहे. १२ मे रोजी याबाबत अधिकृत घोषणा होणार आहे. बच्चू कडू यांना आमदारकी मिळाल्याने जिल्ह्यातील आमदारांची संख्या आता दहावर पोहोचली आहे. त्यांच्या प्रवेशामुळे जिल्ह्यासह विदर्भात शिवसेना पुन्हा मजबूत होणार असल्याचे मानले जात आहे. सव्वा वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत बच्चू कडू यांचा पराभव झाला होता. त्याआधी ते सलग चार वेळा विधानसभेत निवडून आले होते. दरम्यान चार दिवसांपूर्वीच ते शिवसेनेकडून विधान परिषदेवर जाणार असल्याची चर्चा सुरू झाली होती आणि गुरुवारी ती प्रत्यक्षात आली. बुधवारी मुंबईत पत्रकार परिषद घेताना बच्चू कडू यांनी आमदारकीबाबत अनिश्चितता व्यक्त केली होती. मात्र त्याच उर्वरित, पान.४ सुरुवात : १९९४ मध्ये बेलोरा येथून शिवसेनेचे शाखाप्रमुख म्हणून कारकीर्दीला प्रारंभ. प्रहारचा उदय : १९९९ मध्ये स्वतंत्र ‘प्रहार’ संघटनेची स्थापना करून वेगळी ओळख निर्माण पुनरागमन : ३२ वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर पुन्हा एकदा मूळ पक्ष शिवसेनेत प्रवेश. भूमिका : आता ‘प्रहार’ केवळ सामाजिक कार्यासाठी, तर राजकारणासाठी ‘शिवसेना’ हेच माध्यम असल्याची भूमिका. शिवसेना : बच्चू कडूमुळे विदर्भात शिवसेनेला मोठी ताकद मिळाली आहे. महायुती : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीला फायदा धक्का : प्रहार, शिवसेनेच्या एकत्रीत ताकतीने विरोधकांसमोर मोठे आव्हान. आक्रमकता : बच्चू कडूंची आंदोलनाची शैली आता सत्ताधारी पक्षात राहून कशी असेल, याची उत्सुकता. बेलोरा मुळ गावी उघडली होती सर्वप्रथम शिवसेनेची शाखा बच्चू कडू यांनी १९९४ मध्ये शिवसैनिक म्हणून राजकारणाची सुरुवात केली होती. आपल्या मूळ गाव बेलोरा येथे त्यांनी शिवसेनेची शाखा स्थापन केली होती. जनसामान्यांचा नेता आणि कट्टर शिवसैनिक अशी त्यांची ओळख निर्माण झाली होती. ते शिवसेनेतून पंचायत समिती सभापतीही झाले होते. मात्र १९९९ मध्ये त्यांनी शिवसेना सोडून स्वतंत्ररित्या प्रहार संघटनेची स्थापना केली. १९९९ ते २९ एप्रिल २०२६ या काळात त्यांनी प्रहारच्या माध्यमातून निवडणुका लढवल्या आणि राज्यात स्वतंत्र ओळख निर्माण केली. आता शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर प्रहार संघटना ही राजकीय पक्ष म्हणून नव्हे तर सामाजिक क्षेत्रात कार्य करणार असल्याचे संकेत दिले. प्रहार सामाजिक कार्यात नेहमीच सक्रिय राहणार ^आम्ही शिवसेनेत प्रवेश घेतला असला तरीही प्रहार संघटना यापुढेही पुर्वीप्रमाणेच सामाजिक कार्यात सक्रिय राहणार आहे. विदर्भात शिवसेना मजबूत करु. – बच्चू कडू.
