मिसिंग लिंक प्रकल्पाचे आज उद्घाटन:देशातील पहिल्या द्रुतगती मार्गावरील भव्य प्रकल्प; काय आहेत मिसिंग लिंकची वैशिष्ट्ये?

0
copy-of-db-temp-photo-resize-marathi-2026-05-01t12_1777617099.png




आज मुंबई – पुणे महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. पण आजपासून देशातील या पहिल्या द्रुतगती महामार्गावरील प्रवासाचे स्वरुप पूर्णतः बदलणार आहे. आज महाराष्ट्र दिनी या महामार्गावरील प्रवासासाठी मिसिंग लिंकचा पर्याय उपलब्ध होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सुनेत्रा पवार व एकनाथ शिंदे या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज या प्रकल्पाचे उद्घाटन होणार आहे. त्यानंतर उद्यापासून हा मिसिंग लिंक वाहतुकीसाठी खुला होणार आहे. मुंबई – पुणे द्रुगती महामार्ग 2002 मध्ये सुरू झाला. हा देशातील पहिल्या द्रुतगती मार्गांपैकी एक मानला जातो. या महामार्गामुळे पुणे जिल्हा व आसपासच्या परिसराच्या विकासाला मोठा हातभार लागला आहे. या मार्गावर 1996-97 मध्येच खालापूर ते कुसगाव (सिंहगड इन्स्टिट्यूट) दरम्यान 13.3 किलोमीटर लांबीच्या मिसिंग लिंकचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. त्यानंतर 2019 मध्ये या प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम सुरू झाले होते. त्यानंतर अवघ्या 7 वर्षांतच आज हा मार्ग वाहतुकीसाठी खुला होणार आहे. आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या प्रकल्पाचे लोकार्पण होईल. पण कार्यक्रमानंतर मंडप व इतर सर्व अडथळे काढल्याशिवाय या मार्गावरून वाहतूक सुरू करणे सुरक्षित ठरणार नाही. त्यामुळे हा मार्ग आज रात्री उशिरा किंवा मध्यरात्रीनंतरच खुला केला जाईल. त्यानंतरही या मार्गावर केवळ हलक्या वाहनांनाच प्रवेश दिला जाणार आहे. अवजड वाहनांना 31 ऑक्टोबरपर्यंत म्हणजे पुढील 6 महिन्यांपर्यंत या मार्गावर प्रवेशबंदी असेल. पावसाळ्यात वाहतूक कोंडीची समस्या मुंबई – पुणे एक्सप्रेस वेवरील आडोशी बोगदा ते खंडाळा घाट एक्झिट या मार्गावर सर्वाधिक वाहतूक कोंडी होते. हा मार्ग सध्या 6 पदरी आहे. पुढे जाऊन राज्य मार्गाच्या 4 पदरी वाहतूकीशी एकत्र झाल्यामुळे हा मार्ग 10 पदरी होतो. पण पावसाळ्यात या घाट परिसरात दरड कोसळण्याचा धोका निर्माण होत असल्यामुळे 1 लेन बंद ठेवावी लागते. त्यात घाटात अनेक ठिकाणी धोकादायक वळणे असल्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावतो. यामुळे वाहतूक कोंडीची समस्या उद्भवते. पण आता ‘मिसिंग लिंक’वरून प्रवास करताना वाहनचालकांना घाटाचे टेन्शन न घेता बिनधोकपणे प्रवास करता येणार आहे. कसा आहे मिसिंग लिंक प्रकल्प? ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाद्वारे खालापूर ते खोपोली इंटरचेंज दरम्यानच्या रस्त्यांचे रुंदीकरण करण्यात आले आहे. हा 5.76 किलोमीटरचा रस्ता आता 6 पदरीऐवजी 8 पदरी करण्यात आला आहे. त्यापुणे खोपोली एक्झिट ते कुसगावपर्यंत 13.3 किमी भागावर 2 बोगदे व 2 व्हायाडक्ट उभारले आहेत. या मार्गावरील एक बोगदा 8.9 किलोमीटर लांबीचा आहे. तर दुसरा 1.58 किमी लांब आहे. हे दोन्ही बोगदे ‘न्यू ऑस्स्रयन टनेमलुंग मेथड’ (NATM) तुंत्रज्ञानाद्वारे बांधले गेले आहेत. प्रत्येक बोगदा 23.50 मीटर रुंद असून सह्याद्री पर्वतरांगांला पोखरून ते तयार करण्यात आलेत. जगातील सर्वाधिक रुंदीचे बोगदे म्हणून गिनीज बुकमध्ये या बोगद्यांची नोंद होणार आहे. लोणावळा तलावाहून खोल बोगदा ‘मिसिंग लिंक’वरील दुसरा बोगदा लोणावळा तलावाच्या पातळीपासून 180 मीटर खोल आहे. या बोगद्याचे बांधकाम ब्लास्टिंग या आधुनिक तांत्रिक पद्धतीने करण्यात आले आहे. पण ‘मिसिंग लिंक’वर तांत्रिकदृष्ट्या सर्वात आव्हाणात्मक काम म्हणजे या 2 बोगद्यांमधील 650 मीटर लांब केबल-स्टेब पूल. टायगर व्हॅलीच्या मधोमध उभारलेला हा पूल 182 मीटर उंचीचे दोन स्तंभ ईणि 240 केबलवरती उभा आहे. ‘ववुंड टनेल टेस्ट’, ‘फॅ हटग व टे्साइल टेस्ट’ तसेच ‘स्टे केबल टेस्ट’ या आधुनिक चाचण्या करून या पुलाची सुरक्षितता तपासण्यात आली. मिसिंग लिंक म्हणजे काय? ‘मिसिंग लिंक’ला अनेकवेळा एक तांत्रिक चमत्कार असे संबोधण्यात आले आहे. सह्याद्रीच्या पर्वत रांगात अशी महाकाय यंत्रसामग्री पोहोचवून बांधकाम करणे सोपी गोष्ट नव्हती. पावसाळ्यात होणाऱ्या मुसळधार पावसामुळे डोंगर दऱ्यांनी वेढलेल्या या भागात काम करणे फारच जिकिरीचे होते. पण त्यानंतरही हा प्रकल्प पूर्ण करण्यात आला. दोन विभागलेल्या भागांना जोडणाऱ्या रस्त्यांना मिसिंग लिंक असे म्हटले जाते. लोणावळ्यातील घाट आणि डोंगरांनी विभागलेल्या भागाला मिसिंग लिंक जोडतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed