वैजापूरला ट्रक-रिक्षाच्या धडकेत तरुण जागीच ठार:1 गंभीर जखमी, पुरणगाव चौफुलीवरील घटना‎

0
240_177755393269f3520c65d0c_111.jpg




नागपूर-मुंबई महामार्गावर पुरणगाव चौफुली येथे भरधाव ट्रक व मालवाहू रिक्षा यांच्यात धडक होऊन झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू तर अन्य एक गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी घडली. शुभम दिलीप शेटे (वय २२ रा. शेटे वस्ती, भगगाव) असे घटनेतील मृताचे नाव आहे. खुशाल दत्ता निमसे (वय १७ रा. बेलगांव) हा तरुण जखमी झाला. मिळालेल्या माहितीनुसार, शुभम व खुशाल हे भगगाव येथून मालवाहू रिक्षा वाहनाने वैजापूरच्या दिशेने येत असताना पुरणगाव चौफुली येथे त्यांच्या वाहनाची भरधाव ट्रकसोबत धडक झाली. या अपघातात शुभम याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला. तर खुशाल हा जखमी झाला असून त्याला उपचारासाठी शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच वैजापूर पोलिस ठाण्याचे राम कवडे व भगवान सिंगल यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. पोलिसांकडून पंचनामा करण्यात आला. या प्रकरणात पोलिसांत घटनेची नोंद करण्यात आली असून अधिक तपास करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed