शिवाजी कोण होता?' पुस्तकावरून वाद चिघळला:पुस्तकावर बंदी घाला गायकवाडांची मागणी, संवैधानिक मार्गाने गायकवाडांच्या घरावर मोर्चा काढणार- प्रशांत आंबी

0
copy-of-db-temp-photo-resize-marathi-9_1777356027.gif




कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता’ या पुस्तकाच्या वाचनावरून आमदार संजय गायकवाड आणि प्रकाशक प्रशांत आंबी यांच्यातील वाद आता विकोपाला गेला आहे. पुस्तकात महाराजांचा सन्मानपूर्वक उल्लेख हवाच, अशी ठाम भूमिका मांडत गायकवाड यांनी या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. याला प्रत्युत्तर देताना, पुस्तकाचा उद्देश अनादर करणे नसून, लोकशाही मार्गाने आम्ही आमचे म्हणणे मांडणार, असे आंबी यांनी स्पष्ट केले आहे. तर आज आमदार संजय गायकवाड यांच्या घरासमोर मोर्चा काढणार असेही आंबी यांनी म्हटले आहे. 22 तारखेला आमदार संजय गायकवाड यांचा मला कॉल आला त्यावेळी मी त्यांना कएकही चुकीचा शब्द वापरला नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुस्तक पोहोचवत असताना खूप जबाबदारीने वागावे लागते म्हणून मी एकही चुकीचा शब्द वापरला नाही. तेव्हापासून आम्ही संवैधानिक मार्गानेचे पुढे जात आहोत. काल आम्ही गृहमंत्र्यांचा पुतळा जाळणार होतो तो सुद्धा अधिकार आम्हाला घटनेने दिला आहे, असे शिवाजी कोण होता या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांनी म्हटले आहे. गायकवाडांच्या घरावर मोर्चा काढणार प्रशांत आंबी म्हणाले की,आज आम्ही आमदार संजय गायकवाड यांच्या घरावर मोर्चा काढणार आहोत तो सुद्धा संवैधानिक मार्गानेच काढणार आहोत. मोर्चात मी दिसणे महत्त्वाचे नाही. मोर्चातील लोकं माझे प्रतिनिधित्व करतील. पुस्तकाचा उद्देश अनादर करणे नाही प्रशांत आंबी म्हणाले की, शिवाजी कोण होता हे कॉम्रेड गोविंद पानसरे यांचे पुस्तक आहे. त्या पुस्तकाच्या शीर्षकावरुन त्यांचा आदर करत नाही असे म्हणणे योग्य नाही. पुस्तकाचा उद्देश अनादर करणे नाही. आपण जय भवानी जय शिवाजी म्हणतो म्हणजे काही अनादर करतो असे काही नाही. ..मग उद्रेक झाला तर जबाबदारी त्यांची यावर बोलताना आमदार संजय गायकवाड म्हणाले की, पोलिसांनी आमच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारली म्हणून आम्ही आमचा कार्यक्रम रद्द केला आहे. पोलिसांनी त्यांचा सुद्धा कार्यक्रम रद्द केला असताना तुम्ही महाराष्ट्रातील शिवभक्तांच्या जखमेवर मीठ चोळण्याकरता मुद्दाम हे पुस्तक छापणे, प्रती विकल्या, मग आता इथे येऊन पुस्तक वाचण्याची काय गरज आहे. त्यांनी जर पुस्तक वाचण्याचा कार्यक्रम घेतला तर त्याला आम्ही जाणार समोर बसून ऐकणार. पुस्तक वाचताना छत्रपती शिवाजी महाराज यांचा सन्मानपूर्वक उल्लेख केला तर टाळ्या वाजवत स्वागत करू. पण एकेरी भाषेत उल्लेख केला अन् शिवभक्ताचा भावनाचा उद्रेक झाला तर जबाबदारी ही वाचक आणि कार्यक्रमाच्या आयोजकांची राहील. मी अशी काही मागणी केली नाही आमदार संजय गायकवाड म्हणाले की, गोविंद पानसरे यांच्यावर आता गुन्हा दाखल करा अशी कुठलीही मागणी मी केलेली नाही.आमची कुठलीही दहशत नाही. पण कोल्हापुरचा लांडगा येथे येत शिवरायांचा अपमान करेल म्हणून मंडप वाल्याने मंडप काढून नेला असेल. मी अनेक वेळा मागणी केली आहे की शिवाजी महाराज यांचे नाव द्यायचे असेल तर ते सन्मानपूर्वक दिले पाहिजे. महाराजांचा अपमान सहन करणार नाही आमदार संजय गायकवाड म्हणाले की,आमदार रोहित पवार यांनी समजदारी दाखवली. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान सहन करू शकत नाही. सरकारने या पुस्तकावर बंदी घातली पाहिजे. त्यांच्याकडे मान्यता आहे का? हे लोकं कसे लेखक आणि प्रकाशक होतात? छत्रपती शिवाजी महाराज असा उल्लेख त्यांनी पुस्तकात करायला हवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed