सोलापुरातील भोंदू मनोहरच्या आश्रमाची जमीन पत्नीच्या नावे:घोटी येथील गट नंबर 318 मध्ये दोन एकरांत दरबार, सत्संग हॉल, स्वतःसाठी निवास व्यवस्था

0
orig_730-x-548-new-2026-04-27t062750690_1777251438.jpg




भविष्य सांगण्याच्या नावाखाली प्रसिद्धीला आलेल्या करमाळ्याच्या मनोहरमामा उर्फ मनोहर भोसले याने अल्पावधीत मोठी संपत्ती उभी केली आहे. घोटी येथे त्याची पत्नी रूपाली मनोहर भोसलेच्या नावे तब्बल २७ एकर शेती अाहे. याच ठिकाणी जवळपास दोन एकरांवर भव्य आश्रम उभारण्यात आला आहे. मात्र हे बांधकाम पूर्णपणे बेकायदेशीर असल्याची माहिती पुढे आली आहे. घोटी येथील गट नंबर ३१८ मध्ये सुमारे दोन एकर जागेत दरबार हॉल, भविष्य सांगण्यासाठी स्वतंत्र हॉल, सत्संग हॉल, सेवेकऱ्यांसाठी निवास, स्वयंपाकघर तसेच स्वतःसाठी स्वतंत्र राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. विशेष म्हणजे हे सर्व बांधकाम शेतजमिनीवरच करण्यात आले असून त्यासाठी ना वस्ती पड करण्यात आले आहे, ना बिगर शेती (एनए) परवानगी घेतली. दरम्यान, उंदरगाव येथे मात्र त्याचे आई-वडील व भाऊ अजूनही जुन्या पत्र्याच्या घरात राहत आहेत. माझ्या कार्यकाळात बांधकाम परवानगीसाठी अर्ज नाही: माझ्या कार्यकाळामध्ये घोटी येथील शेत जमिनीवर आश्रमाच्या बांधकामासाठी एनए (बिगर शेती) साठी कोणताही अर्ज आलेला नाही. सध्या जर त्या जमिनीच्या उताऱ्यावर वस्ती पड किंवा एनए नसेल आणि जमीन शेती स्वरूपातच असेल तर तेथे झालेले बांधकाम बेकायदेशीरच म्हणावे लागेल असे करमाळ्याच्या तहसीलदार शिल्पा ठोकडे म्हणाल्या. आश्रमाची चौकशी करा : ग्रामपंचायतीची तक्रार घोटी ग्रामपंचायतीकडून पोलिस प्रशासनाकडे तक्रार करण्यात आली आहे. मनोहर भोसले हा आश्रम चालवण्याच्या नावाखाली लोकांची दिशाभूल करत आहे. बाहेरगावाहून येणाऱ्या लोकांची मोठी वर्दळ असायची. गावातील नागरिक मात्र या ठिकाणी जात नसत. संबंधित आश्रमाची सखोल चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी. – विलासराव राऊत, सरपंच, घोटी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed