Hussain Dalwai Hindu Terrorism Statement Sparks Controversy; Minister Lodha Retorts
![]()
बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानांवरून सुरू असलेला वाद शांत होत असतानाच, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हुसेन दलवाई यांनी ‘हिंदू दहशतवादा’बाबत केलेल्या एका विधानामुळे नव्या संघर्षाला तोंड फुटले आहे. “दहशतवादाला कोणताही धर्म नसतो, इतर धर्
.
देशातील सद्यस्थिती आणि धार्मिक ध्रुवीकरणावर भाष्य करताना हुसेन दलवाई म्हणाले की, “भारत हा महात्मा गांधींच्या विचारांवर चालणारा धर्मनिरपेक्ष देश आहे. येथे सर्व धर्मांना समान स्थान आहे. मात्र, दहशतवादाकडे पाहताना आपण एकांगी दृष्टिकोन ठेवता कामा नये. दहशतवादाला स्वतःचा असा कोणताही धर्म नसतो. ज्याप्रमाणे इतर धर्मांत दहशतवादी असू शकतात, तसेच हिंदूही दहशतवादी असू शकतो.” त्यांच्या या विधानामुळे हिंदुत्ववादी संघटनांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
बागेश्वर बाबांनी हिंदूंना अधिक मुले जन्माला घालण्याचे जे आवाहन केले होते, त्याचाही दलवाईंनी समाचार घेतला. “देशातील महागाई आणि बेरोजगारी पाहता असे आवाहन चुकीचे आहे. बागेश्वर बाबांनी स्वतः लग्न करून १० मुले जन्माला घालावीत,” असा टोला त्यांनी लगावला. मुस्लिम समाज आता कुटुंब नियोजनाबाबत जागरूक झाला असून लहान कुटुंब हीच काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
हिंदू कधीच दहशतवादी नसतो – मंगलप्रभात लोढा
हुसेन दलवाईंच्या विधानाचा समाचार घेताना कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी अत्यंत कडक शब्दांत प्रत्युत्तर दिले. लोढा म्हणाले, “हुसेन दलवाई किंवा अबू आझमी हे सर्व एकाच थैलीचे चट्टेबट्टे आहेत. हिंदू हा मूळचा देशभक्त आहे, तो कधीही दहशतवादी होऊ शकत नाही. जर हिंदू दहशतवादी झाले असते, तर ज्याने भारतात बॉम्बस्फोट घडवले त्या याकूब मेमनच्या माफीसाठी पत्र लिहिणारे लोक आज लोकप्रतिनिधी म्हणून फिरू शकले नसते. हिंदू दहशतवादी असतो असे वाटणे ही त्यांची विकृती आहे.”
हे ही वाचा…
‘केईएम’च्या नामांतरावरून राजकीय रणकंदन:मंत्री लोढांचा ‘एकलव्य’चा प्रस्ताव; ठाकरेंच्या आमदारांचा विरोध, आंदोलनाचा इशारा
मुंबईतील ऐतिहासिक ‘किंग एडवर्ड मेमोरियल’ (केईएम) रुग्णालयाचे नाव बदलून ते ‘कौशल्य श्रेष्ठ एकलव्य स्मारक रुग्णालय’ करण्याच्या मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या प्रस्तावामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. या प्रस्तावाला पालिकेच्या आरोग्य समितीने प्राथमिक मंजुरी दिल्याचे समजताच, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने याविरोधात रस्त्यावरच्या लढाईची हाक दिली आहे. या नामांतरामुळे मुंबईची अस्मिता आणि इतिहास पुसण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. सविस्तर वाचा…
