बुद्ध पौर्णिमेनिमित्त पुण्यात सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी:बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समितीतर्फे “धम्म पहाट” कार्यक्रमाचे आयोजन

0
afcae209-5086-408f-9162-481c78e2bb25_1777283024989.jpg




पुणे येथे बुद्ध पौर्णिमेनिमित्त ‘विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती’तर्फे १ ते ३ मे २०२६ या कालावधीत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे यंदा २० वे वर्ष असून, यानिमित्त भव्य खिरदान वाटपही केले जाणार आहे. ही माहिती समितीचे अध्यक्ष आणि पुणे शहराचे उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. वाडेकर यांनी सांगितले की, या उपक्रमांतर्गत शुक्रवार, १ मे २०२६ रोजी पहाटे ५ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, पुणे स्टेशन येथे बुद्ध-धम्म गीतांचा ‘मंगलमय पहाट’ हा कार्यक्रम होईल. चेतन चोपडे यांच्या संकल्पनेतून ‘तुझ्या पाऊलखुणा भीमराया’ हा विशेष सांगीतिक कार्यक्रम सादर होणार असून, विकास साळवे, चेतन चोपडे आणि स्नेहल प्रधान यांचा यात सहभाग असेल. तसेच, बुद्ध पौर्णिमेनिमित्त शनिवार, २ मे आणि रविवार, ३ मे २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजता ‘बुद्ध-धम्म संध्या’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम तथागत गौतम बुद्ध विहार, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, जोशी गेट येथे पार पडेल. २ मे रोजी सिने कलाकार आणि युवा संगीत क्षेत्रातील लोकप्रिय गायक भाग्यश्री अंधारे, संतोष मोरे आणि निखिल महाडे हे बुद्ध-भीम गीते सादर करतील. तर ३ मे रोजी अशोक गायकवाड आणि त्यांच्या टीमकडून ‘रथ भीमाचा हा नेऊ पुढे’ हा विशेष कार्यक्रम सादर होणार आहे. यावेळी विठ्ठल गायकवाड उपस्थित होते.नागरिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed