अमोल मिटकरींची जय पवारांसाठी लॉबिंग:विधान परिषदेच्या जागेसाठी अप्रत्यक्षपणे सूचवले नाव; NCP च्या एका जागेसाठी 7 नावे चर्चेत

0
copy-of-db-temp-photo-resize-marathi-2026-04-27t16_1777289266.png




सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या वाट्याला येणाऱ्या विधान परिषदेच्या एका जागेवर कुणाला पाठवणार? याविषयी राजकीय वर्तुळात खमंग चर्चा रंगली आहे. या प्रकरणी राष्ट्रवादीच्या अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक बोलावली आहे. पण तत्पूर्वीच आमदार अमोल मिटकरी यांनी या जागेसाठी जय पवार यांचे नाव सुचवून एकच धुरळा उडवून दिला आहे. राज्यातील विधान परिषदेच्या 10 जागांसाठी येत्या 12 मे रोजी निवडणूक होणार आहे. विधानसभेतील संख्याबळानुसार, सत्ताधारी भाजपच्या वाट्याला सर्वाधिक 6, तर शिवसेना व राष्ट्रवादीच्या वाट्याला अनुक्रमे 2 व 1 जागा येणार आहे. यात राष्ट्रवादीच्या एका जागेसाठी मोठी लॉबिंग सुरू आहे. सुनेत्रा पवारांनी या मुद्यावर तोडगा काढण्यासाठी पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक बोलावली आहे. पण तत्पूर्वीच आमदार अमोल मिटकरी यांनी जय पवारांच्या नावाची शिफारस करून त्यांच्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. काय म्हणाले अमोल मिटकरी? अमोल मिटकरी म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधानपरिषदेच्या एका जागेसाठी कार्यकर्ते व नेत्यांच्या जवळच्या लोकांची लॉबिंग व चढाओढ पाहता आगामी काळात राज्यभर पक्ष वाढीसाठी अजितदादांसारखा विश्वासु व युवा चेहरा पुढे आणण्याची आवश्यकता आहे. सद्यस्थिती जय पवार हे नाव या जागेसाठी सर्वोत्तम आहे. कदाचित इतरांना घराणेशाही वाटेल ते वाटू देत मात्र दादा नंतर भविष्यात हा चेहरा महाराष्ट्रासाठी दादांसारखाच आश्वासक वाटतो.दादांची उणीव भरून करण्याची क्षमता असलेला हा चेहरा राष्ट्रवादी पक्षासाठी संजीवनी ठरेल..अर्थात अंतिम निर्णय पक्षाचा, असे ते म्हणालेत. मिटकरी यांच्या या भूमिकेमुळे जय पवारांच्या नावावरही राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीत चर्चा होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीच्या एका जागेसाठी 7 नावांची चर्चा दुसरीकडे, राष्ट्रवादीच्या वाट्याला येणाऱ्या एका जागेसाठी तब्बल 7 नेत्यांची नावे चर्चेत आहेत. यात प्रफुल्ल पटेल यांचे निकटवर्तीय माजी आमदार राजेंद्र जैन, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे चिरंजीव अनिकेत तटकरे, दिवंगत बाबा सिद्दीकी यांचे सुपुत्र झिशान सिद्दीकी, राष्ट्रवादीचे प्रवक्ते आनंद परांजपे, सुनील टिंगरे, सिद्धार्थ कांबळे व उमेश पाटील यांचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed