Top OTT Movies | ओटीटीवर मनोरंजनाचा धमाका: या आठवड्यात काय पाहणार? वाचा लिस्ट

0
sayali-web-2026-04-27T121616.730.webp.webp


Top OTT Movies | ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांसाठी हा आठवडा मनोरंजनाची मोठी मेजवानी घेऊन आला आहे. नेटफ्लिक्स, प्राइस व्हिडिओ आणि जिओहॉटस्टार यांसारख्या प्लॅटफॉर्मवर विविध धाटणीचे चित्रपट आणि वेब सिरीज प्रदर्शित होणार आहेत. एप्रिल अखेर आणि मे महिन्याची सुरुवात प्रेक्षकांसाठी रोमांचक ठरणार असून, यात क्राईम ड्रामापासून ते हॉररपर्यंत सर्वच प्रकारचा आशय उपलब्ध असेल.

ग्लोरी

खेळ आणि गुन्हेगारी विश्वाची पार्श्वभूमी असलेली ‘ग्लोरी’ (Glory) ही वेब सिरीज १ मे २०२६ पासून नेटफ्लिक्स (Netflix) वर प्रदर्शित होत आहे. पुलकित सम्राट (Pulkit Samrat), दिव्येंदू (Divyenndu) आणि आशुतोष राणा (Ashutosh Rana) यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या सिरीजचे दिग्दर्शन करण अंशुमन (Karan Anshuman) यांनी केले आहे. बॉक्सिंगच्या रिंगणातील संघर्षावर आधारित ही कथा प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी ठरेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

‘राकासा’

हॉरर चित्रपटांच्या चाहत्यांसाठी ‘राकासा’ (Rakasa) हा तेलुगू चित्रपट १ मे पासून उपलब्ध होणार आहे. मानसा शर्मा (Manasa Sharma) दिग्दर्शित या चित्रपटाने चित्रपटगृहात चांगली कामगिरी केल्यानंतर आता तो तमिळ, हिंदी, कन्नड आणि मल्याळम भाषांमध्ये स्ट्रीम केला जाईल. याच दिवशी मुलांसाठी ‘स्वॅप्ड’ (Swapped) हा अमेरिकन ॲनिमेटेड चित्रपट आणि अडेला नावाच्या मुलीची कथा सांगणारा स्पॅनिश चित्रपट ‘माय डिअरेस्ट सेनोरीटा’ (My Dearest Senorita) देखील प्रदर्शित होत आहे.

‘बॅचमेट्स’

इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यावर आधारित ‘बॅचमेट्स’ (Batchmates) ही तेलुगू वेब सिरीज ३० एप्रिल २०२६ पासून जिओहॉटस्टार (JioHotstar) वर पाहता येईल. कॉलेजमधील रॅगिंग आणि विद्यार्थ्यांच्या संघर्षाचे पदर या सिरीजमध्ये उलगडण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे, २९ एप्रिल रोजी प्राइम व्हिडिओ (Prime Video) वर ‘द हाऊस ऑफ द स्पिरिट्स’ (The House of the Spirits) ही हॉरर ड्रामा मालिका दाखल होत आहे, जी एका कुटुंबातील पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या वैराची आणि सामाजिक क्रांतीची कथा मांडते.

दरम्यान, ‘लॉरेन्स ऑफ पंजाब’ (Lawrence of Punjab) या माहितीपट मालिकेच्या प्रदर्शनाबाबत मात्र अनिश्चितता निर्माण झाली आहे. २७ एप्रिल रोजी झी ५ (ZEE5) वर प्रदर्शित होणारी ही मालिका वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने (Ministry of Information and Broadcasting) दिलेल्या सूचनेनुसार या मालिकेचे प्रदर्शन सध्या पुढे ढकलण्यात आले आहे. त्यामुळे प्रेक्षकांना या वादग्रस्त डॉक्युमेंटरीसाठी सध्या प्रतीक्षा करावी लागणार आहे.

News title: Top OTT Movies And Series Releasing This Week

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed