श्रीरामपुरात "नारी शक्ती'चा जागर; विविध क्षेत्रांतील महिलांचा गौरव:जिद्दीने संघर्ष करणाऱ्या महिला नारी शक्ती पुरस्काराने सन्मानित
![]()
महिला सन्मान होणे काळजी गरज आहे. स्त्री-पुरुष भेदभाव न करता पुरुषांच्या बरोबरीने कार्य करणाऱ्या प्रत्येक महिलेचा सन्मान अपेक्षित असल्याचे मत आमदार हेमंत ओगले यांनी व्यक्त केले. श्रीरामपूर नगरपरिषद आयोजित सन्मान नारी शक्तीचा या कार्यक्रमामध्ये आमदार ओगले बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष राजश्री ससाणे होत्या तर प्रमुख उपस्थिती सिने अभिनेत्री जान्हवी किल्लेकर यांची होती. नगराध्यक्ष करण ससाणे म्हणाले, श्रीरामपूर नगर परिषदेच्यावतीने जागतिक महिला दिनानिमित्त सन्मान नारी शक्तीचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. तळागाळातील प्रतिकूल परिस्थितीवर मात करून ज्यांनी कार्य केले त्या महिलांचा सन्मान करण्याचा प्रयत्न नगरपरिषदेने केला आहे. या पुढील काळात देखील श्रीरामपूर नगरपालिका महिला सक्षमीकरणासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. जिल्हाध्यक्ष सचिन गुजर म्हणाले, माजी आमदार स्व. जयंत ससाणे यांनी श्रीरामपूर येथे महिला दिनाच्या निमित्ताने भव्य कार्यक्रम घेतले. आज नगरध्यक्ष करण ससाणे आणि त्यांच्या सर्वच सहकाऱ्यांनी त्याच प्रकारे कार्यक्रमाचे आयोजन करून महिला सन्मान केला आहे. यावेळी मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप, माजी सभापती बाबासाहेब दिघे, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर मुरकुटे, सभापती सुधीर नवले, शहराध्यक्ष अण्णासाहेब डावखर, आशाताई दिघे, गटनेत्या वैशाली चव्हाण, नगरसेविका निलोफर शेख, जायदाबी कुरेशी, प्रणिती चव्हाण, सोनिया कक्कड, नवनीतकौर सेठी आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. श्रीरामपूरातील प्रतीक्षा कोते, कलावती देशमुख, तेजस्वी शिंगारे, डॉ. मोहम्मदी शेख, प्रियंका निकम, विमल गिरमे, मीलाग्रीन कदम, मोनिका जैन, कोमल चौधरी, छाया भोसले, अनिता गायकवाड, दीपा भवर, योगिता महाले, तेजश्री डोखे, कल्पना शेलार, प्रियंका भिसे, शितलकौर टाक, कृष्णमाई भजनी मंडळ या महिलांना नारी शक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रस्ताविक महिला बालकल्याण समितीच्या सभापती मंजुश्री मुरकुटे यांनी केले तर स्वागत उपनगराध्यक्ष कांचन सानप यांनी केले. आभार उपसभापती रागेश्वरी एडके यांनी मानले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष मते यांनी केले. यावेळी नगरपरिषदेतील अधिकारी, कर्मचारी व शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
