गोऱ्हेंना विधान परिषदेची उमेदवारी नकोच!:24 वर्ष आमदार असूनही पक्ष वाढीसाठी शून्य काम, शिंदेंनी बिचकुलेंना संधी द्यावी- तृप्ती देसाई

0
new-project-2026-04-26t133325591_1777192021.jpg




एकनाथ शिंदे यांनी नीलम गोऱ्हे यांना विधान परिषदेची उमेदवारी देऊ नये. त्यांनी पक्ष संघटना वाढीसाठी काहीही काम केलेले नाही, महिलांसाठी काही काम केले नाही. त्या ज्या भागात राहतात त्या भागात त्यांना साधा एक नगरसेवक निवडून आणता आलेला नाही, पक्ष संघटना न वाढवणाऱ्या व्यक्तीलाच संधी द्यायची असेल तर अभिजीत बिचकुले यांना संधी द्यावी, असे तृप्ती देसाई यांनी म्हटले आहे. तृप्ती देसाई म्हणाल्या की, गेली 24 वर्षे तुम्ही पक्षाच्या आमदार आहात या 24 वर्षांमध्ये त्यांनी पक्षासाठी काय काम केले. समाजासाठी, महाराष्ट्रासाठी काय काम केले. तुम्हाला आमदारकी मिळावी यासाठी तुम्ही इतर महिलांना डावलन्याचे काम केले आहे. मी यासंदर्भात शिवसेनेचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांना पत्र लिहले आहे. गोऱ्हेंनी 24 वर्षांमध्ये काय केले? तृप्ती देसाई म्हणाल्या की, नीलम गोऱ्हे यांचे वय 70 वर्षे आहे. काम न करणाऱ्या लोकांना उमेदवारी द्यायची असेल तर अभिजीत बिचुकले यांना दिली पाहिजे. ते कलाकरांसाठी काम करतील, ते नीलम गोऱ्हे यांच्यापेक्षा चांगले काम करतील. तरुण महिला नेतृत्वाना संधी दिली पाहिजे. तसे नसेल तर बिचकुले यांना संधी द्यावी. गोऱ्हेंना जनतेने कधीच स्वीकारलेले नाही. नीलम गोऱ्हे यांनी अनेक वर्षे काम केले आहे. गेली 24 वर्षे त्या आमदार आहेत. एकनाथ शिंदेंनी पक्षातील तरुण महिलांना संधी दिली पाहिजे. बिचकुले हिंदुत्ववादी तृप्ती देसाई म्हणाल्या की, गोऱ्हे या पक्षातील ज्येष्ठ नेत्यांच्या संपर्कात असतात त्यामुळे त्यांना विधान परिषदेची संधी मिळते. मला पुण्यातील शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी फोन करत ही खंत व्यक्त केली. अभिजीत बिचकुले हे हिंदुत्ववादी विचार सरणीचे आहेत, ती विचारसरणी शिंदेंच्या पक्षाची आहे, म्हणून त्यांना संधी देण्यात यावी. काही कलाकारांनी बिचकुलेचे नाव शिंदेपर्यंत पोहोचवले आहे. भोसले रुपाली ठोंबरेंचे गुरू का? तृप्ती देसाई म्हणाल्या की, मनोहर भोसले यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी ही मागणी मी केली होती. त्यांना भविष्य कळत होते तर त्यांना हे कसे कळले नाही की पोलिस अटक करायला येत आहे. मनोहर भोसलेबद्दल अनेक राजकीय नेत्यांचे फोटो आहेत. रुपाली पाटील ठोंबरेयांचा सुद्धा फोटो मनोहर भोसलेसोबत आहेत. त्या त्यांच्या वकील सुद्धा होत्या. भोसले ठोंबरे यांचे गुरू होते का? असा सवाल देसाई यांनी केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed