कर्ज उद्दिष्ट पूर्ण करणाऱ्या बँक अधिकाऱ्यांचा गौरव:मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमात जिल्हाधिकाऱ्यांकडून सत्कार
![]()
जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम आणि प्रधानमंत्री सूक्ष्म प्रक्रिया उद्योगांतर्गत कर्ज मंजूरीचे उद्दिष्ट पूर्ण करणाऱ्या बँक अधिकाऱ्यांचा गौरव करण्यात आला. गाव पातळीवर उद्योग उभारण्यासाठी बँकांनी आवश्यक पतपुरवठा करावा, असे आवाहन यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या सत्कार समारंभात जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक नरेश हेडाऊ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते, जिल्हा उद्योग अधिकारी निलेश निकम आणि जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी प्रदीप चेचरे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना जिल्हाधिकाऱ्यांनी बँकांनी कर्जवाटप करताना उद्योगांप्रती सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा असे सांगितले. बँकांची निर्मिती ही छोट्या उद्योगांना पतपुरवठा करण्यासाठी झाली आहे आणि हा पतपुरवठा सामान्य नागरिकांनी बचतीच्या स्वरूपात गोळा केलेल्या पैशांतून केला जातो. मोठ्या उद्योगांप्रती सकारात्मक धोरण असताना छोट्या उद्योगांनाही पतपुरवठा करण्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले. गावातील प्रक्रिया उद्योगांना पतपुरवठा झाल्यास ग्रामीण भागाचा विकास होण्यास मदत होईल, असेही त्यांनी नमूद केले. कर्ज प्रकरणे मंजूर करण्याचे उद्दिष्ट पूर्ण केलेल्या बँक व्यवस्थापकांचा यावेळी सत्कार करण्यात आला. यात बँक ऑफ बडोदाचे प्रशांत गावंडे, लोहिता के.एस., जयदीप राठोड; बँक ऑफ इंडियाचे रणजीत ठाकरे, घनश्याम ढवळे; बँक ऑफ महाराष्ट्रचे प्रफुल शेंडे, प्रशांत चरडे, रुपेश नंदनवार, प्रफुल रसाळपायले, शिवशंकर फड, आलोक कोठेकर, मृणाल क्रांती राणा; कॅनरा बँकेच्या योगिता देशमुख, संदीप तेटे; सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे अजित लिंगाटे, महेंद्र येलमे, नवनीत उमाळे, अमर दाभर्डे, संदीप सूर्यवंशी; स्टेट बँक ऑफ इंडियाचे सुदीप्ता घोष, जयंत मोरे, पंकज समर्थ, कमर सगीर, रिचा निमोणकर, मधुकर तळपदे, अभिनव राऊत, निधी अग्रवाल; युनियन बँक ऑफ इंडियाचे अक्षय सोनोने यांचा समावेश होता. याव्यतिरिक्त, स्टेट बँक ऑफ इंडियाचे प्रादेशिक व्यवस्थापक नवीनकुमार उप्पलवार, मुख्य व्यवस्थापक रविकुमार दाळू, ललित त्रिपाठी; बँक ऑफ महाराष्ट्रचे प्रादेशिक व्यवस्थापक महेश डांगे, प्रोसेसिंग हेड प्रवीण जंगम; सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे एलडीएम नरेश हेडाऊ, प्रादेशिक व्यवस्थापक सुनील पांडे; कॅनरा बँकेचे प्रादेशिक व्यवस्थापक रामबाबू मीना; बँक ऑफ बडोदाचे प्रादेशिक व्यवस्थापक राजेश कुमार आणि बँक ऑफ महाराष्ट्रचे जिल्हा समन्वयक अमोल मोरे यांचाही गौरव करण्यात आला. या सर्वांना स्मृतीचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. कर्जवाटपाच्या बाबतीत अमरावती जिल्ह्याचा वरचष्मा कायम राहिला आहे. गेल्यावर्षी जिल्ह्याने प्रधानमंत्री सूक्ष्म प्रक्रिया उद्योगांमध्ये राज्यात दुसरा क्रमांक पटकावला होता. सध्या जिल्ह्यात शासन सहाय्य करणाऱ्या योजनांची एक हजाराहून अधिक प्रकरणे बँकांकडे प्रलंबित आहेत.
