छत्रपती संभाजीनगरात जागतिक हिवताप दिन साजरा:जनजागृती रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

0
e5621a48-e767-4439-bc80-124857ec205b_1777117578845.jpg




छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका मलेरिया विभाग आणि जिल्हा हिवताप कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने २५ एप्रिल २०२६ रोजी जागतिक हिवताप दिन उत्साहात साजरा करण्यात आला. महानगरपालिकेचे महापौर समीर राजूरकर, उपमहापौर राजेंद्र जंजाळ आणि आयुक्त अमोल येडगे यांच्या आदेशानुसार, तसेच वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या दिनानिमित्त क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून जनजागृती रॅली काढण्यात आली. सहाय्यक संचालक (मलेरिया) डॉ. रेखा भंडारे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. हिवतापाबाबत माहिती, प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि प्रबोधनात्मक घोषणा देत ही रॅली क्रांती चौक, सिल्लेखाना, समर्थनगर मार्गे सिद्धार्थ उद्यानापर्यंत काढण्यात आली. यावेळी जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. आर.बी. ढोले, सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. उज्वला भामरे, जिल्हा हत्तीरोग अधिकारी डॉ. वैशाली पाटील आणि महानगरपालिका जीवशास्त्रज्ञ (प्र.) डॉ. सय्यद सुमय्या यांची प्रमुख उपस्थिती होती. सिद्धार्थ उद्यानात हिवतापाचे प्रदर्शन भरवण्यात आले होते, ज्याचे उद्घाटन वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांच्या हस्ते झाले. यावर्षीचे घोषवाक्य ‘हिवताप दुरीकरणासाठी कटीबद्ध: आता हे शक्य आहे. आता हे केलेच पाहिजे’ असे होते. डॉ. पारस मंडलेचा आणि डॉ. आर.बी. ढोले यांनी निरोगी आरोग्यासाठी डास प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबवण्याचे आवाहन केले. नागरिकांनी आपले घर आणि परिसर स्वच्छ ठेवावा, डास उत्पत्तीची ठिकाणे नष्ट करावीत, दर आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळावा आणि हिवताप प्रतिज्ञेतील संदेश घरोघरी पोहोचवावा, असे आवाहन डॉ. पारस मंडलेचा यांनी केले. प्रदर्शनात डासांचे विविध प्रकार, गप्पी मासे आणि डासांच्या जीवनचक्राची माहिती देण्यात आली, तसेच हस्तपत्रिकांचे वाटप करण्यात आले. यावेळी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला आणि हिवतापाबाबत प्रतिज्ञा घेण्यात आली. महानगरपालिकेचे व जिल्हा हिवताप कार्यालयाचे सर्व बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी, कीटकसमूहनाशक, मलेरिया झोनल पर्यवेक्षक आणि फवारणी कर्मचाऱ्यांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जीवशास्त्रज्ञ (प्र.) डॉ. सय्यद सुमय्या, डॉ. आदित्यकुमार जोशी, शेख दानिश, मिलिंद जबंगी, डिंगबर कोथळकर, मनिषा ठाकरे, आशिष पाटील, निखिल ठाकरे, मलेरिया पर्यवेक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed