यापुढे बाबासाहेबांचे नाव कधीही घेऊ नका:माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांना श्याम मानव यांचा सल्ला; धीरेंद्र शास्त्रींच्या भेटीवरून केली टीका

0
copy-of-db-temp-cover-marathi-2026-04-25t164042413_1777115408.jpg




भारताचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी काही दिवसांपूर्वी मध्यप्रदेश येथील छातरपूर जिल्ह्यातील बागेश्वर धामला सहकुटुंब भेट दिली होती. तसेच त्यांनी धीरेंद्र शास्त्री यांच्यासोबत अर्धा तास चर्चा देखील केल्याची माहिती समोर आली होती. तसेच या भेटीचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यावरून भूषण गवई यांच्यावर टीका होताना दिसत आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष श्याम मानव यांनी पत्रकार परिषद घेत गवई यांच्यावर टीका केली आहे. माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी आता यापुढे बाबासाहेबांचे नाव घ्यायचे नाही, असा सल्ला श्याम मानव यांनी दिला आहे. तसेच ते म्हणाले, बबहुशान गवई धीरेंद्र शास्त्री महाराजांच्या पाया पडायला गेले होते याचा मला प्रचंड शॉक बसलाय. भूषण गवई म्हणतात की मी आंबेडकरी विचारांचा आहे. आंबेडकरी विचारांचे मी दूध प्यायला आहे, पण तो माणूस जर धीरेंद्र शास्त्री महाराजांच्या पाया पडून आशीर्वाद घेत असेल तर आता तुम्ही यापुढे आंबेडकरांचे नाव कधीही घ्यायचे नाही. तो अधिकार तुम्ही गमावलेला आहे, असे मानव म्हणाले. पुढे बोलताना श्याम मानव म्हणाले, भूषण गवई हे रा.सू. गवई यांचे सुपुत्र आहेत. यापूर्वी विक्तू बाबांचा सत्कार दीक्षाभूमीवर घेतला त्यावेळेस मी विरोध केला होता. धीरेंद्र शास्त्री यांनी अनेकवेळा वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. कालच त्यांनी नागपूर येथे छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्या बद्दल वादग्रस्त वक्तव्य केले आहे. दरम्यान, नागपूर येथे बोलताना धीरेंद्र शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त विधान केले होते. महाराज युद्ध करून थकले आणि त्यांनी स्वामी समर्थ चरणी आपले राज्यपाट देऊ केले असे विधान त्यांनी केले होते. आधीच भूषण गवई यांच्या भेटीने वादात सापडलेले शास्त्री आता पुन्हा नवीन वादात सापडले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed