राज्यात योग्यवेळी राजकीय भूकंप होईल:मंत्री संजय शिरसाट यांनी दिले सूचक संकेत; एकनाथ शिंदे योग्यवेळी योग्य निर्णय घेतील असा दावा

0
copy-of-db-temp-photo-resize-marathi-2026-04-25t15_1777112672.png




दिल्लीतील आम आदमी पार्टीत झालेल्या बंडाळीनंतर आता महाराष्ट्रातही राजकीय भूकंप होण्याच्या चर्चेने जोर धरला आहे. सत्ताधारी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा मंत्री संजय शिरसाट यांनी या चर्चेला आता हवा दिली आहे. आमच्या संपर्कात अनेकजण आहेत हे आम्ही नाकारत नाही. पण ऑपरेशन टायगर असे सांगून केले जात नाही. या प्रकरणी एकनाथ शिंदे योग्य वेळी योग्य निर्णय घेतील, असे ते म्हणालेत. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडाळीनंतर आता दिल्लीतील आम आदमी पार्टीत मोठी बंडाळी उफाळून आली आहे. माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वातील या पक्षाच्या 7 खासदारांनी शुक्रवारी भाजपत जाण्याची घोषणा केली. यामुळे अवघ्या देशाच्या राजकीय वर्तुळात हल्लकल्लोळ माजला असताना आता महाराष्ट्रातही ऑपरेशन टायगर राबवले जाणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. मंत्री संजय शिरसाट यांनी शनिवारी याविषयी एक सूचक विधान केले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील बहुतांश लोकप्रतिनिधी आपल्या संपर्कात असल्याचा दावा त्यांनी केला. नेमके काय म्हणाले मंत्री संजय शिरसाट? संजय शिरसाट म्हणाले, आपचे जे 6-7 खासदार भाजपमध्ये गेले ते राज्यसभेचे सदस्य आहेत. या प्रकरणी आम्हाला काही सूचना किंवा आम्ही ऑपरेशन टायगर राबवतोय असा कोणताही भाग नाही. पण ज्या दिवशी हे ऑपरेशन टायगर करायचे आहे, ते असे सांगून केले जात नाही. आमच्या संपर्कात सर्वजण आहेत. आमच्या संपर्कात कुणीही नाही हे आम्ही नाकारत नाही. परंतु योग्य निर्णय केव्हा घ्यायचा, हा सर्व भाग जो आहे तो एकनाथ शिंदे साहेबांकडे आहे. त्यावेळी महाराष्ट्राच्या राजकारणात एक वेगळा भूकंप निश्चितपणे होईल. संजय शिरसाट यांच्या या विधानामुळे ठाकरे गटाचे कोणते नेते व पदाधिकारी शिंदे गटाच्या संपर्कात आहेत? याची खमंग चर्चा रंगली आहे. विधान परिषदेच्या 2 जागांसाठी 12 जण इच्छुक संजय शिरसाट यांनी यावेळी शिवसेनेकडून विधान परिषदेवर कोण जाणार? याविषयी आपले मत व्यक्त केले. या प्रकरणी बच्चू कडू व नीलम गोऱ्हे यांची नावे चर्चेत असल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली असता त्यांनी 10-12 जण इच्छुक असल्याचे स्पष्ट केले. विधान परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या वाट्याला 2 जागा येणार आहेत. या प्रकरणी 10-12 इच्छुक उमेदवारांच्या नावांची यादी एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. आता त्यात कुणाचा नंबर लागणार याविषयी माध्यमांत वेगवेगळे दावे केले जात आहेत. पण आतापर्यंत अशी कोणतीही चर्चा झाली नाही. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने लॉबिंग करत असतो, असे ते म्हणालेत. हे ही वाचा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed