संजय गायकवाड यांच्या विधानाशी पक्षाचा संबंध नाही:शिवसेनेची 'शिवाजी कोण होता' वादापासून फारकत; संयमाने वागण्याचा सल्ला

0
copy-of-db-temp-photo-resize-marathi-2026-04-24t13_1777019035.png




सत्ताधारी शिवसेनेने बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या ‘शिवाजी कोण होता’ या पुस्तकाविषयी केलेल्या वादग्रस्त विधानापासून फारकत घेतली आहे. संजय गायकवाड यांच्या विधानाशी पक्षाचा कोणताही संबंध नाही. ते त्यांचे वैयक्तिक वाचर आहेत. त्यांच्या व्हायरल क्लीपचीही सत्यता आम्हाला माहिती नाही, असे शिवसेनेने म्हटले आहे. आमदार संजय गायकवाड यांनी कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या शिर्षकावरू प्रकाश प्रशांत आंबी यांना शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली आहे. या प्रकरणी गायकवाड यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. काँग्रेसने या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र पाठवून संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणी सत्ताधारी शिवसेनेची प्रचंड कोंडी झाली असताना या सत्ताधारी पक्षाने आता गायकवाड यांच्या विधानपासून स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. गायकवाड यांच्या विधानाचे समर्थन नाही संजय गायकवाड हे आमदार आहेत. त्यामुळे बोलताना त्यांनी संयम राखला पाहिजे. त्यांनी वापरलेली भाषा चूक आहे. या सगळ्यामुळे एकनाथ शिंदे व पक्षाची बदनामी होते हे त्यांच्या लक्षात येत नाही. मी प्रवक्ता म्हणून एवढेच सांगेन की, आम्ही त्यांच्या विचारांशी सहमत नाही. एका पुस्तकावरून अशी शिवीगाळ करणे व पुस्तकाची सत्यता काय आहे हे जाणून न घेता प्रतिक्रिया देणे हे संयम नसल्याचे द्योतक आहे. त्यांच्या अशा वागण्याने पक्ष नेतृत्वावर आक्षेप येईल, हे गायकवाड यांच्या लक्षात आले नाही. त्यांनी या प्रकरणी केलेले विधान हे त्यांचे वैयक्तिक मत आहे. पक्ष त्याचे समर्थन करत नाही, असे शिवसेना प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी म्हटले आहे. पत्रकारांनी यावेळी प्रकाश महाजनांना शिवसेना संजय गायकवाड यांच्यावर कारवाई करणार का? असा प्रश्न केला. त्यावर महाजनांनी उत्तर देणे टाळले. आमदार संजय गायकवाड यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय एकनाथ शिंदेच घेतील. प्रवक्ता म्हणून मी व पक्ष त्यांच्या विचारांशी सहमत नाही, असे महाजन म्हणाले. नीलम गोऱ्हेंचा पाठराखण करण्याचा प्रयत्न उल्लेखनीय बाब म्हणजे संजय गायकवाड यांच्या विधानावरून गुरुवारी राज्यात तीव्र पडसाद उमटले. या प्रकरणी शिवसेनेवर टीकेची झोड उठली असताना शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी गायकवाड यांची पाठराखण करण्याचा प्रयत्न केला. संजय गायकवाड यांची भूमिका योग्य होती, पण त्यांनी जी कृती केली ती अयोग्य होती, असे त्या म्हणाल्या. पण आता स्वतः पक्षानेच गायकवाड यांच्या विधानापासून फारकत घेतल्यामुळे त्यांची अडचण होण्याची शक्यता आहे. आता पाहू काय आहे नेमका वाद? आमदार संजय गायकवाड यांनी शिवाजी कोण होता? या दिवगंत कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना अश्लील शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली. यासंबंधीची एक ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियात व्हायरल झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करणारा गोविंद पानसरे कोण? असे म्हणत गायकवाड आंबी यांना घरात घुसून मारीन, चिरडून टाकण्याची आणि जीभ कापून टाकण्याची धमकी दिली. तसेच, पानसरेंचे काय झाले? माहिती आहे ना? असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. त्यांच्या या विधानाचे आता राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed