वसमतमध्ये विनापरवाना पुतळा उभारल्याप्रकरणी 55 जणांवर गुन्हा दाखल:वाखारीत जमावबंदी आदेशांचे उल्लंघन, ग्रामपंचायतीचे सीसीटीव्हीही हटवले

0
whatsapp-image-2026-04-24-at-102455-am_1777006536.jpeg




वसमत तालुक्यातील वाखारी येथे अनाधिकृतरित्या महापुरुषांचा पुतळा उभारून जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या 55 जणांवर वसमत ग्रामीण पोलिस टाण्यात गुरुवारी ता. 23 गुन्हा दाखल झाला आहे. यावे्ळी जमावाने ग्रामपंचायतकडून बसविण्यात आलेले सीसीटीव्ही काढून घेतल्याचे तक्रारीत नमुद करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत तालुक्यातील वाखारी येथे गावातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या बाजूला शासकीय जागेवर अतिक्रमण करून काही जणांनी गुरुवारी ता. 23 पहाटे चार ते सकाळी सहा यावेळेत महापुरुषांचा अनाधिकृतरित्या पुतळा उभारला. सदर पुतळा उभारणीसाठी सुरक्षित कठडाही बांधण्यात आलेला नाही. तसेच ग्रामपंचायतीने या ठिकाणी बसविलेला सीसीटीव्ही कॅमेरा काढून घेतला. जमावाने शासकीय आदेशाचे पालन केले नाही तसेच जिल्हाधिकारी यांनी जारी केलेल्या जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केले. या प्रकरणी ग्रामपंचायत अधिकारी काशीनाथ भंडारे यांनी वसमत ग्रामीण पोलिस ठाण्यात गुरुवारी ता. 23 रात्री तक्रार दाखल केली. यावरून पोलिसांनी सुरेश बर्वे, विशाल ढोरे, उध्दव ढोरे, शाम ढोरे, आदीनाथ ढोरे, किशोर ढोरे, गजानन बर्वे, कपील ढोरे, आदीनाथ रावसाहेब ढोरे, शाम ढोरे, बळीराम ढोरे, मारोती ढोरे, रावसाहेब ढोरे, विनायक ढोरे, मुंजाजी ढोरे, नवनाथ ढोरे, बळीराम एकनाथ ढोरे, गंगाप्रसाद बर्वे, रामराव ढोरे, भानुदास ढोरे, माधवराव ढोरे, विनोद ढोरे, विश्‍वंभर ढोरे यांच्यासह एकूण 55 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. वसमत ग्रामीण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन बोराटे, उपनिरीक्षक एकनाथ डक, जमादार विजय उपरे, विनायक जानकर, आंबादास विभुते, नामदेव बेंगाळ यांच्यासह पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. उपनिरीक्षक डक पुढील तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *